रवि पुजारी यांची महाराष्ट्र संघात निवड

सातारा : महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो. तर्फे सिलेक्शन ट्रायल मध्ये सातार्‍याचा रवि पूजारी, महाराष्ट्र संघातून मास्टर्ससाठी निवड करण्यात आली. ही निवड वाकड येथे झाली. 1 सप्टेंबर रोजी छतिसगड प्रदेश बॉडी बिल्डर्स असो. च्या मान्यतेने मि. आशिया स्पर्धेसाठी सिलेक्शन ट्रायल छतीसगड येथे होणार आहे. ही स्पर्धा आयबीबीएफ च्या मान्यतेने होणार आहे.
त्याचे अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, डॉ. अनंत साठे, विनोद कुलकर्णी, चंद्रशेखर घोडके, प्रविण पाटील, मिथिल भंडारे, फैय्याज बागवान, गणेश जाधव, दिया बगाडे, नंदू पवार, अ‍ॅड. नितीन माने, अ‍ॅड. सचिन तिरोडकर, अ‍ॅड. शार्दूल टोपे, अमित कासार, राजेंद्र हेंद्रे ,मुरली वत्स यांनी अभिनंदन केले.