सातार्‍यातील परप्रांतीयांच्या चौकशीची मनसेची मागणी ; अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी निषेध

सातारा : आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचा परप्रांतीय राजेश नायक नावाच्या व्यक्तीने विनयभंग केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून सातार्‍यातील सर्व परप्रांतीयांची चौकशी करुन ओळखपत्रे ताब्यात घेवून त्याची शासन दरबारी नोंद करावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र स्वरुपात आंदोलन केले जाईल अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुढे बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात परप्रांतीयांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. छोट्या, मोठ्या गुन्ह्याचे प्रकार परप्रांतीयांकडून सुरु आहेत. यामुळे अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सातार्‍यात तर एक आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण राजेश नायक नावाच्या परप्रांतीयाने केले आहे. याबाबत पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. परप्रांतीयांनी कायद्याप्रमाणे ब रोल भरुन पोलीस ठाण्यात माहिती देणे सक्तीचे आहे मात्र जाणीवपूर्वक माहिती लपवून परप्रांतीयांकडून गुन्ह्याचे प्रमाणे वाढतच चालले आहे. महाराष्ट्रात तर विविध जिल्ह्यात गुन्हे करुन परप्रांतीय पळून जात आहेत. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपासही होत नाही. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेवून सातार्‍यातील परप्रांतीयांच्या नोंद ठेवून पोलिसांचाही त्यांच्यावर अंकुळ रहावा, मराठी माणसाकडून अनेक रोजगार परप्रांतीयांकडून हिसकावून घेतले जात आहे.
पत्रकार परिषदेस मनसेचे साषतारा शहराध्यक्ष राहुल पवार, धैर्यशील पाटील, अ‍ॅड. विकास पवार, राजू केंजळे, सतीश यादूव,अझर शेख आदी उपस्थित होते.