महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन 2018 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

सातारा : सन -2018 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर ) प्रसिध्द करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक परीक्षेचे नाव पूर्व परीक्षा दिनांक व मुख्य परीक्षा दिनांक पुढील प्रमाणे. राज्य कर (विक्रीकर ) निरीक्षक परीक्षा 2017 (मागणीपत्र प्राप्त दिनांक 19 एप्रिल,2017) मुख्य परीक्षा दिनांक 7 डिसेंबर 2018 , राज्य सेवा परीक्षा 2018 दि.8.4.2018 व दि.18,19 व 20.8.2018 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 6.5.2018. संयुक्त पेपर क्रमांक 1 दि.26.8.2018. पेपर क्रमांक 2 पोलीस उप निरीक्षक दि.2.9.2018. पेपर क्रमांक 2 राज्य कर निरीक्षक दि.30.9.2018. पेपर क्रमांक 2 सहाय्यक कक्ष अधिकारी दि.6.10.2018. महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा दि. 13.5.2018 व मुख्य परीक्षा दि.8.9.2018. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा दि. 20.5.2018 मुख्य परीक्षा दि. 9.9.2018. महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि.10.6.2018 संयुक्त पेपर क्रमांक 1 दि. 14.10.2018, पेपर क्रमांक 2 लिपिक – टंकलेखक दि.21.10.2018, पेपर क्रमांक 2 दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , गट- क दि.4.11.2018, महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा-2018 पेपर क्रमांक 2 कर सहायक दि. 2.12.2018, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा-2018 दि.28.10.2018, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2018 दि.8.7.2018 , महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2018 दि.17.11.2018, महाराष्ट्र विदयुत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2018 दि.24.11.2018, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2018 दि.25.11.2018, महाराष्ट्र विदयुत / यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2018 दि.15.12.2018, महाराष्ट्र शिक्षण सेवा , गट – ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2018 दि.4.8.2018, सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2018 दि.25.8.2018 रोजी.
शासनाकडून संबंधित पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल .या गृहितकाच्या आधारे उपरोक्त अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र झाल्यासच नियोजित दिनांकास पदे विज्ञापित करणे व पुढील वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. उपरोक्त वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना / दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. उपरोक्त अंदाजित वेळापत्रकाबाबची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा याजना , अभ्यासक्रम , निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे . व आयोगाच्या धोरणानूसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील जाहिरात अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी कळविले आहे.