२३ व्या कॅप्टन एस. जे. ईझीकल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये साताऱ्यातील कु. गार्गी उदयराज फडतरे हिला कांस्यपदक

सातारा -:  मुबंई येथे पार पडलेल्या २३ व्या कॅप्टन ईझीकल महाराष्ट्र स्टेट चॅंपियनशिपमध्ये साताऱ्यातील कु.गार्गी उदयराज फडतरे हिने २४५ गुणांचा वेध घेत २५ मिटर ०.२२ स्पोर्टस् पिस्टल प्रकारात कांस्यपदक पटकावले.
विशेष म्हणजे दहावीची परिक्षा संपवल्यानंतर मिळालेल्या केवळ २०-२२ दिवसांच्या प्रॅक्टिसच्या जोरावर तिने हे यश प्राप्त केले ते सुद्धा तिच्या पहिल्या प्रयत्नात. आनंदाची बाब म्हणजे कोल्हापूरच्या राही सरनोबतने याच दिवशी याच प्रकारात सुवर्णपदक जिंकून आॅलिंपिक स्थान पक्के केले. त्या वाटचालीवर असणाऱ्या गार्गीचे हे यश निश्चितचं सुखावह आहे.
गार्गीला शिवराज ससे, महेश घाडगे, श्री. व सौ. प्रदीप ससे, कन्हैय्यालाल राजपुरोहित यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबाबत खा.श्री छ उदयन राजे भोसले आणि श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले भोसले यांनी विशेष अभिनंदन केले.