माणदेशी महोत्सवास नागरिकांचा उदंड प्रतिसाद 

सातारा : येथील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या माणदेशी महोत्सवास नागरिकांचा खूप मोठा प्रतीसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणात महिला व इतर नागरिक महोत्सवात येत आहेत. माण देशात प्रामुख्याने मिळत असलेल्या ज्वारी बाजरी, मूग मटकी अशा धान्यांसह माणदेशाची ओळख असलेली घोंगडी, जेन, खलबत्ते, केरसून्या, यासारख्या अनेक वस्तूंची खरेदी प्रचंड प्रमाणात नागरिक करत आहेत.
माणदेशी फाऊंडेशनच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माण तालूक्यातील नागरीकांनी विक्रिसाठी अनेक वस्तू मांडलेल्या आहेत. माण देशातील सर्वच धान्ये ही चवदार असतात. या महोत्सवात  शेतकर्‍यांना थेट विक्री करता येत असल्याने शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होत असल्यामूळे ग्राहकांना स्वच्छ व उच्च प्रतीचा कृषीमाल माफक दरात मिळत असल्याने ग्राहक वर्ग समाधानी आहे.
या माणदेशी महोत्सवात खवैय्यांसाठी देखील विक्रीसाठी  खाद्य स्टॉल्स सरबतापासून ते बिर्यानी पर्यंत विविध पदार्थ चाखायला सातारकरांना या महोत्सवात मिळत आहेत. आज दि. 24 नोव्हेंबर2017 रोजी या महोत्सवात जिल्हा परिषद  सातारा व माण देशी फाऊंडेशन यांच्या वतीने अंगणवाडी सेविका व महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये त्यांना स्त्रीयांचे आजार, कर्करोग, मुलांचे कुपोषन इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ञांनी दिली.
सातारकरांचे मनोरंजन करण्यासाठी अलबेला इव्हेंट प्रस्तूत ऑर्केस्ट् पंचरंगी हा सदाबहार हिंदी, मराठी, लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सूरूवातीला बोलताना श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या की, या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणारे साहित्य त्या कारागिरांनी खूप मेहनीतीने जीव ओतून बनवलेले असतात. तरी त्या मालाची खरेदी सातारकर दरवर्षी करत असतात तरी ती याही वर्षी मालाची खरेदी करून त्यांना सन्मान मिळवून द्यावा असे आवाहन श्रीमती सिन्हा यांनी केले.या कार्यक्रमाला सातारकरांनी भरघोस प्रतीसाद दिला.
यावेळी या कार्यक्रमाला माण देशी महिला बँकेच्या रेखा कुलकर्णी , माण देशी फाऊंडेशनच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी वनिता शिंदे व माण देशी फाऊंडेशन व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.