दुष्काळी माण तालुक्यात माणदेशी फाउंडेशनचा चारा छावणीत मदतीचा हात

म्हसवडः दुष्काळी स्थितीमुळे चारा व पाणी टंचाईने ग्रासलेल्या जनावरांसाठी श्रीमती चेतना सिन्हा यांनी येथील माण देशी फाऊंडेशनच्या माध्यमाने एक जानेवारी पासुन सुरु केलेल्या जनावरांच्या चारा छावणीत आज चौथ्या दिवशी सुमारे साडेतीन हजार जनावरे दाखल झाली. येथील मधील मेगासिटीच्या प्रशस्त व बंदीस्त खुल्या जागेतील छावणीत आश्रयास आलेल्या प्रत्येक जनावरांना 15 किलो व एक किलो पेंड ,पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा दिल्या जात आहेत.
छावणी सुरु होताच मोठ्या संख्येने शेतकरी आपली जनावरे घेऊन या छावणीत मुक्कामी ये ऊ लागली आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामासह चालु रब्बी पीक हंगामात पेरणी केलेली पिके पाणी टंचाईमुळे करपुन गेलीत परिणामी जनावरांना चारा व पिण्याचे पाणी टंचाई समस्या शेतकक्षययांना जाणऊ लागली. यंदाच्या दुष्काळाची तहव्रता गंभीर होत चालली आहे.
शासन पातळीवर जनावरांची छावणी सुरु केली जाईल याची अपेक्षा शेतकरी वर्गात होती परंतु: अद्यापही छावणी सुरु न झाल्यामुळे दुभती जनावरे विक्री करणे हाच एकमेव मार्ग शेतक-यांपुढे होता.म्हसवड भागातील गावोगावच्या शेतकक्षययांच्या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने श्रीमती चेतना सिन्हा यांनी जनावरांची चारा छावणी सुरु करण्याचा धाडशी निर्णय घेतला. व शासकीय मदतीविना बजाज व बृहत समाज मुंबई यांचे सहयोगातुन राज्यातील पहिली जनावरांची चाराछावणी सुरु करुन भुकेने व्याकुळ होत चाललेल्या मुक्या जनावरांना दिलासा दिला आहे.
छावणी सुरु होताच गावेगावचे शेतकरी कुटुंबे जनावरांच्या सोबतच छावणीत मुक्कामी येऊ लागले आहेत.छावणीत टँकरने वेळोवेळी पुरेसा पाणी पुरवठा जनावरांच्या मुक्कामीस्थळी तोही खात्रीपुर्वक केला जात असल्यामुळे बालगोपाळासह शेतकरी कुटुंबे मुक्कामी येऊ लागली आहेत. जनावरांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने शेतकरी कुटुंबातील माणसे या छावणीत मुक्कामी आहेत. येत्या चार -पाच दिवसात किमान दहा हजाराहुन अधिक संख्येने जनावरे या छावणीत आश्रयास येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.