मँगो मस्ती फूड फेस्टिव्हलला हॉटेल राधिका पॅलेसमध्ये प्रतिसाद

सातारा : येथील हॉटेल राधिका पॅलेसतर्फे ता. 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत मँगो मस्ती फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या फेस्टीव्हलमध्ये कैरी पन्हे, आमरस पुरी, आंबा लस्सी, डाळ कैरी, कैरी भाजी, आंबा कढी, आम्रखंड, आंबा रसमलाई, आंबा शेवई खीर, आंबा बर्फी, छुंदा, थेपला, कैरी का आचार मँगो सलाड आदी पदार्थांसमवेत राधिका पॅलेसचाी चमचमीत थाळी फा फेस्टिव्हलचे खास आकर्षण ठरत आहे. दुपारी 12 ते 1 व रात्री 7 ते 8 या वेळेत जेवण करण्यास आल्यास हॅपी अवर्सच्या माध्यमातून 75 रुपये डिस्काउंट देण्यात आला आहे. फॅमिली बोनान्झामध्ये आइ व बाबांसोबत एक मुलगा अथवा मुलीस फ्री जेवण (वय 10 पर्यंत) तसेच या फेस्टिव्हलमध्ये डायनिंग हॉलमध्ये मँगो थीमवर सजावट करण्यात आली आहे. सर्वांनी मँगो मस्ती फुड फेस्टिव्हलचा मनसोक्त आस्वाद घ्यावा, असे आवाहन हॉटेल व्यवस्थापनाने केले आहे.