सातार्‍यात मानिनी जत्रेतील स्टॉलधारकांचा प्रकल्प संचालकांना घेरावा

सातारा :  ( अजित जगताप )सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सातारा शहरातील जि. प. मैदानावर दि 23 डिसेंबर रोजी राज्य सरकार व सातारा जिल्हा परिषद, ग्रामीण विकास यंत्रणा यांनी मानिनी जत्रेचे आयोजन केले. यावेळी स्टॉल वाटप करताना वशिलेबाजी झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच स्टॉलधारकांनी प्रकल्प संचालक व इतर कर्मच्यारांना आज सायंकाळी साडेसहा वाजता घेरावा घातला.
सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या वस्तूची विक्री व प्रदर्शन आणि राजमाता जिजाऊ स्वावलबन पुरस्कार योजना सन 2017-18 निमित्त ही जत्रा भरविली होती. यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या आल्या होत्या.त्यांच्या ऐवजी वशिलेबाजी व व्यापारी दुष्ठीकोन ठेवून आलेल्या काही लोकांना हे स्टॉल वाटप करण्यात आले. काही एजंट हे अधिकारी वर्गावर दबाव आणून आपल्या मर्जीतील बचत गटाशी संबंध नसणार्‍या व्यक्तींना हे स्टॉल मिळवून देण्यासाठी आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला संतप्त झालेल्या होत्या. यामुळे अधिकारी वर्गाला त्यांची समजूत काढताना थंडीतही घाम फुटला होता.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही जत्रा उपयुक्त ठरेल, पण ज्यांचा वशिला मोठा त्यांना स्टॉल व इतरांना कनिष्क समजण्यात येत आहे अशी टीका अनेक महिला बचत गटाच्या पद्धधिकारी करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत स्टॉल वाटपाचा घोळ मिटला नाही. दरम्यान, याबाबत अधिकारी वर्गाने प्रसार माध्यमांशी संवाद टाळण्यात धन्यता मानली. त्यामुळे त्यांची भूमिका समजू शकली नाही.