जिजाऊंच्या लेकींना पडली चंद्रकोराची भुरळ…! मानिनी जत्रेमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी

सातारा : सातारा जिल्ह्यातील जिजाऊंच्या लेकींना बाजारापेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा ग्रामिण यंत्रणा आणि सातारा जिल्हा परीषद यांच्या वतीने आयोजित मानिनी जत्रा मधील सातारकर जिजाऊंच्या लेकिं चंद्रकोरच्या प्रेमात पडल्या आहेत. पुसेगावमधील हिंदवी महीला बचत गट यांच्या शिवसामुग्री स्टॉलचा या मानिनी जत्रेत मोठा बोलबाला आहे. या मानिनी जत्रेत खरेदीसाठी येणाऱ्या तरूण- तरूणी, महीला हिंदवी महीलि बचतगटच्या स्टॉलवर गर्दी करत आहेत. सातारकर जिजाऊ लेकी खृपाळाला चंद्रकोर लाऊन मराठा संस्कृती जपत आहेत. या मानिनी जत्रेत महिलांनी तयार केरेल्या चटणी,पापड,लोंची या बरोबर मसाले,कपडे,कडधान्ये,दागिणे,खेळणी आधी स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील महीला बचतगटानां बाजारपेठ मिळण्यासाठी मानिनी यात्रेचा हेतू साद्य होताना दिसत आहे.या प्रदर्शनात हिंदवी स्वयं साहय्यता महीला गटाचा शिवसामुग्रीचा स्टॉल वैशिष्ट्येपुर्ण ठरत आहे. या गटाच्या महीला अध्यक्ष किर्ती सुर्यवंशी आणि दमयंती सावंत या सार्वच जिजाऊ लेकींच्या कपाळाला चंद्रकोर लावत असल्याने मानिनी जत्रा चंद्रकोरमय झाली आहे. या बचतगटाच्या स्टॉल मध्ये शिवाजी महाराजांच्या मारबल मुर्ती ,शिवरायांची चंद्रकोर , शिवगंध ,शिवराय किचन,राजमुद्रा अंगटी आदी वस्तूंच्या समावेश आहे. या बचतगटाच्या माध्यमातून शिवरायांच्या मुर्ती तयार करण्यात आल्याचे अध्यक्षा किर्ती सुर्यवंशी यांनी सांगितले