फलटणमधील क्रांती मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी

 
18-phaltan-morcha3फलटण (प्रतिनिधी)- कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला पाशवी अत्याचार व क्रुर हत्येच्या निषेधाबरोबरच अट्राँसिटी कायद्यारमध्ये बदल करावा,मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे,झिरपवाडी,ता.फलटण येथील कै.जोतीराम चव्हाण यांची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,मराठा समाजावरील अन्याय,अत्याचार थांबवावेत अशा मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी फलटण येथे येथील तहसिलदार कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चा धडकला.फलटण शहराच्या इतिहासामध्ये या मोर्चाने विक्रम नोंदविला आहे.या मोर्चामध्ये 1 लाखाच्यावर लोक यामध्ये सामील झाले होते. मराठा क्रांती मोर्चामध्ये कमालीची शांतता,शिस्तीने सहभाग हे या मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.आजवर फलटण शहरामध्ये अनेक मोर्चे झाले परंतु असा शिस्तबद्ध मोर्चा फलटणच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडला.मराठा समाजातील लोकांनी या मोर्चा यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत घेतलेली दिसुन आली.विशेषतः या मोर्चामध्ये महिला व युवतींचा सहभाग पुरुषांपेक्षा जास्त दिसुन आला.या मोर्चासाठी फलटण तालुक्यातील खेड्यापाड्यातुन लोक आलेले होते.महिला व युवतींनी या मोर्चामध्ये आपल्या हातामध्ये शासनापर्यंत आपला संदेश जावा यासाठी आपल्या मागण्या असणारे फलक हातामध्ये घेतले.मराठा क्रांती मोर्चासाठी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या ग्राउंड महिला,युवती,पुरुष,युवक मोठ्या संख्येने आपल्या हाती भगवा ध्वज घेऊन आपआपले ग्रुप घेऊन याठिकाणी येताना दिसत होते.याठिकाणावरुन मोर्चाची सुरुवात झाली.क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चा पुढे निघाला.या मोर्चामध्ये महिला पुढच्या बाजुला होत्या.पुढे छ.शिवाजी चौकामध्ये पुतळ्यात पुष्पहार अर्पण करुन मोर्चा थेट डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आल्यावर त्याठिकाणी पुष्पहार अर्पण करुन महावीर स्तंभ चौक,उमाजी नाईक चौक,गजानन चौक,महात्मा फुले चौक मार्गे तहसिल कार्यावर पोहचला.18-phaltan-morcha1

सकल मराठा समाजाच्या वतीने फलटण तहसिला कार्यावर मराठा क्रांती मोर्चा दुपारी 12.30 वाजता धडकला.या मोर्चामध्ये पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांची असलेली संख्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती.मोर्चेकरयांनी पाच युवतींच्या हस्ते येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.कोपर्डीच्य प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच हे प्रकरण फास्ट ट्रँक कोर्टामध्ये चालवुन सहा महिन्यात या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी.दुरुपयोग होत असलेल्या अँट्राँसिटी कायद्यामध्ये बदल करावा,सरसकट मराठा समाजाचा कुणबी ओबीसी प्रवर्गात उल्लेख करुन आरक्षण देण्यात यावे,झिरपवाडी,ता.फलटण येथील कै.जोतीराम चव्हाण यांची गोळ्या घालुन अमानुषपणे हत्या करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची संपुर्ण कर्जमाफी व्हावी अशा प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
तत्पुर्वी एका युवतीच्या माध्यमातून शासनास देण्यात येणार्‍या निवेदनाचे वाचन करण्यात आले.मोर्चास स्वराज संघटना,फलटण व्यापारी संघटना,फलटण बार असोशिएन,मुस्लीम संघटना,बेडर रामोशी संघटना,ब्राह्यण समाज आशा अनेक संघटना यांच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला.मोर्चात मराठा समाजातील सर्व स्तरातील मंडळी सहभागी झाली होती.कुणाचेही नेतृत्व नसलेला मोर्चा,जेवढे पुरुष तेवढ्याच महिला,चार हजाराहुन अधिक स्वयंसेवक,पोलिसांचा तगडा बंदोबस्त,युवतींकडुनच उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन असे मराठा क्रांती मोर्चाचे वैशिष्ट्य होते

फलटण शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने मोर्चास आलेल्या मोर्चेकरांसाठी उमाजी नाईक चौक,गजानन चौक,महात्मा फुले चौक याठिकाणी पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती हे ही या मोर्चामध्ये वैशिष्ट्य ठरले

मराठा क्रांती मोर्चामधे फलटण नगर परिषदेचे कर्मचारी तसेच शासकीय कर्मचारी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.