जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते पाटण येथे मराठा जातीच्या दाखल्यांचे वितरण…

पाटण:- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे जगभरात शांततेच्या मार्गाने झालेले ५८ मोर्चे, या मोर्च्यांचे गांर्भींय सरकारने घेतले नाही म्हणुन महाराष्ट्रात या मोर्च्यांचे रुपातंर ठोक मोर्च्यात झाले. या ठोक मोर्च्यात ४८ मराठा बांधवांनी दिलेले बलिदान व हजारो बांधवांनी अंगावर घेतलेल्या पोलिस केसेस या संघर्षातून सरकारला मराठा समाजापुढे झुकावे लागले. व मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागले. यात कोणाचेही राजकीय श्रेय नाही हे संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने जगाला दाखवुन दिले. मराठा समाजाला आरक्षणासाठी लागणाऱ्या मराठा जातीचे प्रमाणपत्र देखील संपुर्ण महाराष्ट्रात समाजाला मिळण्यास सुरवात झाली. या पार्श्वभुमिवर मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुक्यातील पहिले पाच मराठा प्रमाणपत्र जिजाऊंच्या लेखी विद्यार्थीनी यांच्या हस्ते मराठा बांधवांना देण्यात आले.
तहसिल कार्यालया समोर झालेल्या मराठा प्रमाणपत्र वितरणावेळी पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे सदस्य यशवंतराव जगताप, सुरेश पाटील, धर्यशिल पाटणकर, संजय इंगवले, अमित जाधव, विक्रम यादव, युवराज सांळुखे, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, तानाजी सांळुखे, राजेंद्र मोरे, कुमार सांळुखे, चैत्यण्य दळवी, आदी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक होते.
मराठा जातीचे प्रमाणपत्र हे विद्यार्थांना शिक्षणातील व नोकरीतील आरक्षणासाठी लागू होणार आहे. या प्रमाणपत्र दाखल्यासाठी तहसिल कार्यालय सेतू केंद्रात विद्यार्थांची गर्दी होत असताना दिसत आहे. मराठा जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळण्यासाठी सेतू केंद्रा मार्फतच मराठा जातीच्या प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात यावा. व महाईसेवा केंद्रातुन कोणतीही अडवणुक न करता शासकीय दरानुसार पावती देऊन मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यात यावे. महाईसेवा केंद्रातुन पावती न मिळाल्यास मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीस संपर्क साधावा असे ही अहवान मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने केले आहे.
यावेळी जिजाऊंच्या लेखी पायल सावंत, अनिता सुर्यवंशी, ऋतुजा सांळुखे, योगिता सांळुखे, शुभांगी निवडुंगे, कोमल शिर्के यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मराठा जातीचे पहिले पाच प्रमाणपत्र ओंम मोहिते, अमित घाडगे, दिनकर पाटील, राजेश शिंदे, प्रविण सांळुखे, या मराठा विद्यार्थी बांधवांना देण्यात आले. यावेळी मराठा बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.