पाटण येथे मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलन ; हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर मोर्चा ; जो पर्यंत मराठा बांधवावरील गुन्हे मागे घेणार नाही , तो पर्यंत ठिय्या आंदोलन चालू राहणार

 

पाटण:- मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि आरक्षणासाठी पाटण मधे सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनासाठी ९ औगस्टला संपूर्ण पाटण तालुक्यातील विविध भागातुन सकल मराठा समाज सकाळी १० वाजता. नविन एस. टी. स्टैंड पाटण येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित झाला. येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून मराठा समाज मोर्चाने तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. तहसील कार्यालय येथे आल्यानंतर मराठा रणरागिणीं भगिनींच्या हस्ते शिवाजी प्रतिमेचे पूजन करून ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. जो पर्यंत मराठा बांधवावरील गुन्हे मागे घेणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचा या मोर्चात निर्धार करण्यात आला.
सकाळी १० वाजल्यापासून नविन बस स्थानक परिसरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तालुक्यातील विविध भागातुन जमा होऊ लागले. बस स्थानक परिसरात मराठा मोर्चा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. कराड-चिपळुन महामार्गावरुन मोर्चा झेंडाचौक, लायब्ररी चौक, राजवाडा, सिध्दार्थनगर  मार्गे तहसिल कार्यालयासमोर आला. मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका आयोजित या मोर्च्यात सातारा जिल्हा समन्वयक सुधाकर देशमुख, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर आणि मराठा मोर्चा  समन्वय समितीचे कार्यकर्ते व मराठा बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या. या पाठोपाठ आमदार शभुंराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये दुसरा मोर्चा झेंडा चोक लायब्ररी चौक राजवाडा सिध्दार्थनगर मार्गे तहसिल कार्यालया समोर आला
एक मराठा लाख मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मराठा समाज बांधवांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणुन गेला होता. मोर्चा तहसिल कार्यालयासमोर आल्यानंतर मराठा भगिनिंच्या  हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समन्वयक सुधाकर देशमुख यांनी ठिय्या आंदोलन आचारसंहिता सर्वांना सांगितली. यामध्ये येते कोणी नेता नाही सर्वजण मराठा बांधव म्हणुन एकत्र आलो असल्याचे प्रतिपादन केले.
ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाल्यानंतर सुधाकर देशमुख,.संजय इंगवले, सुरेश पाटील चंद्रहार निकम यांचे सह महाविद्यालयातील मराठा युवती व युवकानी आरक्षाना संर्दभांत तिव्र भावना व्यक्त केल्या.

पाटण येथील ठिय्या आंदोलन बेमुदत होणार आहे. असे मंगळवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समिती पाटण तालुका च्या नियोजन मेळाव्यात ठरले आहे. गुरुवारी या आंदोलनाला जाताना सर्व मराठा बांधवांनी एकत्र जायचे आहे. असे ठरले असताना पाटण चे आंदोलन राजकीय गटा- तटात विखुरले गेल्याचा प्रत्यय पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीला आला.
समन्वयक समितीने ९ औगस्ट चे होणारे ठिय्या आंदोलनाची सुरुवात नवीन एस. टी. स्टैंड पाटण येथील समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून ठिक ११ वाजता होईल. सर्व मराठा बांधवांनी तिथेच एकत्र येऊन ठिय्या आंदोलनात सामील व्हावे. असे आवाहन केले होते. या अहवानाला राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर यांनी प्रतिसाद देत समन्वयक समितीने ठरविलेल्या मोर्चात सामील झाले. मात्र आ. शंभूराज देसाई यांनी एकत्र मोर्चात सामील न होता. आपल्या गटाचा स्वंतत्र मोर्चा तहसील कार्यालयावर आणला. या ठिकाणी ठिय्या आंदोलन किमान पाच दिवस चालेल असे समन्वयक समितीने अहवान केले असताना. दुपारी २.३० वा.सुमारास कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. आणि ठिय्या आंदोलनातून निघून गेले. यावरून पाटण तालुक्यातील मराठा समाज न्यायहक्कासाठी एकत्र आला ? कि गटा – तटा साठी एकत्र आला. याचा प्रत्यय उपस्थितांना आला.

–  पाटण शहरासह तालुक्याच्या तारळे चाफळ .मल्हारपेठ .नवारस्ता .ढेबेवाडी .मोरगिरी .कोयनानगर या प्रमुख बाजार पेठा सह त्या त्या विभागात आपली दुकाने बंद ठेवुन  बंद कडकडीत पाळण्यात आला तर  एस टी .सह.खाजगी प्रवाशी वाहतुक रिक्षा .या सह संपुर्ण वाहतुक बंद ठेवली होती कुठेही अनुचित प्रकार घडुन बंदला  गालबोट लागणार नाही याची खबरदारी समन्वयकानी घेतली होती.

–  पाटण पोलिसांचा बंदोबस्त चोख .
गेल्या महिन्यात बंद काळात अडुळ  .व काळोली .येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले होते तर एका एस टी वर दगड फेक करण्यात आली होती त्या अनुषंगाने पाटणचे उपविभागिय पोलिस अधिकारी अगंद जाधवर  व पाटण पोलिस.स्टेशनचे सपोनि यू एस भापकर .यांचे नेतृत्वा खाली पोलिस बंदोबस्त चोक ठेवण्यात आला होता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही याची खबरदारी घेतली होती