१५ ऑगस्टला सगळीकडे होणार जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते ध्वजारोहण ; या मागणीला बहुजन समाजाचा पाठिंबा

 

आंदोलन ठिकाणी महिला- भगिनी सह नागरिकांचा भजनाचा कार्यक्रम.
   
आंदोलन ठिकाणी पिठलं भाकरी खाताना आंदोलक.

पाटण:-   पाटण तहसील कार्यालयासमोरील मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन ४ थ्या दिवशी सुरूच असून या आंदोलनाला बहुजन समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला. आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशी मागणी शासनाकडे केली. तर बुधवारी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या  १५ ऑगस्ट ला सगळीकडे सर्व समाजातील जिजाऊंच्या  लेकींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या मराठा समाजाच्या मागणीला देखील बहुजन समाजाने पाठिंबा दिला. जो पर्यंत  मराठा बांधवावरील दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. तो पर्यंत पाटणचे ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

पाटण येथे  ४ थ्या दिवशी बेमुदत सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनात महीला- नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर आंदोलन ठिकाणी दिवसभर महिलांनी भजनाचा कार्यक्रम केला.

तर यावेळी बहुजन समाजाच्या बांधवांनी आंदोलन ठिकाणी येऊन मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. मराठा समाज हा

सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा समाज आहे. या समाजावर शासनाकडून नेहमीच अन्याय झाला आहे. मराठा समाज आपल्या न्यायहक्कासाठी झगडत आहे. मराठा समाजाच्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या या आंदोलनास बहुजन समाजाचा पाठिंबा आहे.  तर बुधवारी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या  १५ औगस्ट ला सगळीकडे सर्व समाजातील जिजाऊंच्या  लेकींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या मराठा समाजाच्या मागणीला देखील बहुजन समाजाने पाठिंबा दिला आहे.  १५ औगस्ट ला सर्व शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालय, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, सहकारी संस्था  येथे जिजाऊंच्या लेंकीच्या हस्ते ध्वजारोहण होण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. मग ती जिजाऊंची लेक कोणत्याही समाजाची असेल तरी चालेल.  असा निर्णय पाटण येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या ४ थ्या  दिवशी देखील बहुसंख्येने घेण्यात आला. मराठा आंदोलनात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवांनी यावेळी सांगितले.

पाटण येथे ९ औगस्ट पासून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनाच्या ४ थ्या  दिवशी पाटण तालुक्यातील बहुसंख्येने मराठा समाज उपस्थित होता.  यावेळी नवारस्ता येथील बहुजन समाज बांधव अनिल पुजारी, रामदास कदम, अडुळ, नवारस्ता मित्रपरिवाराकडून  आंदोलकांना पिठलं, भाकरी, ठेचा असे भोजनाचे नियोजन केले होते.