मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा; चार जणांना अटक

महाबळेश्‍वर : रस्त्यात वाहतुकीवरून झालेल्या किरकोळ कारणावरून रांजणवाडी येथील सात जणांच्या टोळक्याने भिलार येथील रोहन भिलारे व रोहीत भिलारे या दोन युवकांना लोखंडी रॉड काठी व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्या प्रकरणी महाबळेश्‍वर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून त्या पैकी चार जणांना अटक केली आहे. या चार युवकांना महाबळेश्‍वर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान टोळक्यातील इतर तीन जणांचा महाबळेश्‍वर पोलिस तपास करीत आहे.
भिलार येथील दोन युवक आपल्या कारने महाबळेश्‍वरला येत होते. दरम्यान, समोरून एक भरधाव गाडी आल्याने भिलारे बंधुंना अर्जंट ब्रेक मारावा लागला ़ अर्जंट ब्रेक मारल्याने झालेल्या आवाजाने भिलारे बंधुच्या पुढे असलेल्या मोटार सायकल स्वाराचे लक्ष विचलित झाल्याने तो चिडला व त्यांनी गाडीतील भिलारे बंधुना शिवीगाळ केले तेथे थोडी बाचाबाची झाली व भिलारे बंधु हे तेथुन निघुन आले पुढे दोन मोटार सायकल स्वारांनी इतर पाच लोकांना बोलावुन घेतले व त्या सात जणांच्या टोळक्याने लिंगमळा परीसरात भिलारे बंधुची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला परंतु भिलारे यांनी गाडी थांबविली नाही त्यांनी पाठलाग करून भिलारे यांची गाडी अडवुन त्या तील दोघांना बाहेर काढुन बेदम मारहाण केली व त्यांच्या गाडीची मोडतोड केली तसेच या टोळक्यातल कोणीतरी भिलारे यांच्या गळयातील चैन काढुन घेतली असावी असा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत भिलारे बंधुंनी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात सात जणांच्या त्या टोळक्या विरोधात तक्रार दाखल केली तक्रारी दाखल करून पोलिसांनी महाबळेश्‍वर पासुन दोन किमी अंतरावर असलेल्या रांजणवाडी येथील जुनैद याकुब वारूणकर 28, जुबेर याकुब वारूणकर 26, असलम याकुब वारूणकर 22 व अब्दुल मजीद वारूणकर व इतर तीन अशा सात जणांवर भादवी कलम 143, 147 ,148, 341, 326, 504, 506 या कलमा नुसार गुन्हा नोंद करून सात पैकी वरील चौघांना तात्काळ अटक केली तर तीन जण फरार आहेत महाबळेश्‍वर पोलिस फरार असलेल्या अरोपिंचा शोध घेत आहेत.
दरम्यान, आज या चौघांना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.