समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी यांचे निधन

सातारा :- समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य परम पूज्य श्री श्रीधरस्वामी यांचे अनुग्रहित समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी यांचे आज शनिवारी सकाळी सातारा येथे खासगी रुग्णलयांमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८४ वर्षे होते.हनुमान जयंती च्या वेळी त्यांचा जन्म झाला. म्हणून त्यांचे नाव मारूती असे ठेवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील बुवाचे वाठार येथे त्यांचा जन्म झाला.
सजजनगडावर रामदासी म्हणून कार्यरत असलेल्या बुवांनी श्रीधर स्वामी यांचे मार्ग दर्श न घेत बुवांनी आजपर्यंत रामदास स्वामी यांचे विचारांचा प्रसार केला. अनेक पुस्तकांचं लेखन केले. मनाचे श्लोक. आत्मबोध. यावर त्यांनी सज्जन गड मासिकातून विपुल लेखन केले.सातारा भूषण पुरस्कार प्राप्त झाले ले बुवांनी सिंगापूर येथे ही प्रचारासाठी समर्थ पादुका दौरा केला होता.
देशात विविध राज्यात पादुका दौरा करून समर्थ वांगमया चा त्यांनी मोठा प्रसार केला.रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत बुवांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी समर्थ सदन येथे ठेवण्यात येणार असून त्यानंतर सकाळी अकरा वाजता संगम माहुली येथे अंत्य संस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती मंडळाचे विश्वस्त योगेश बुवा रामदासी यांनी दिली.