मेढा- कुसुंबी- सातारा फेरी सुरू होण्याची शक्यता वाढली असून दक्षिण जावली विभागातील जनतेचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर

 

मेढा ( वार्ताहर ) मेढा आगारातुन सायंकाळी सुटणारी मेढा- कुसुंबी- सातारा फेरी सुरु होण्याची शक्यता असल्याने दक्षिण जावली विभागातील नागरिकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आला आहे.
जावली विभागातील कुसुंबी गावी सायंकाळी ५.३०वाजता गाडी सोडावी अशी या विभागातील नागरिकांची, प्रवाशी वर्ग, कॉलेज विदयार्थी- विद्यार्थिनी यांची अपेक्षा होती हि अपेक्षा काही दिवसात पुर्ण होणार असून हि फेरी सुरू झाल्यानंतर या विभागातील नागरीकांना एस.टी. बसने प्रवास करून मेढा आगारास सहकार्य करण्याची तयारी ठेवावी लागणार असून प्रवाशी वर्गां करीता सुरू होणारी हि फेरी कायमस्वरूपी चालू राहणे कामी परिसरातील गावांचे आणि नागरिकांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे.
मेढा आगारातुन नागरीकांना ये- जा करणे कामी बससेवेचा लाभ मिळत असल्याने नागरिकांत, प्रवाशांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेढा आगारातुन सातारा, पाचवड , बोंडारवाडी , कुसुंबी या गावांना जाणे कामी वेळेत गाडी मिळत असून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेवून धावणारी लालपरी अजुनही ग्रामीण भागात जिथे रस्ता तिथे एस.टी याप्रमाणे पोहोचत असल्याने नागरीकांत, प्रवाशांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस विरूद्ध लढा सुरू असून या कोरोना काळात मेढा आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, ड्रायव्हर, कंडक्टर यांनाही बिकट परिस्थीतीला सामोरे जावे लागत आहे. आलेल्या या प्रसंगाला तोंड दयावे लागत असून या आगारातुन जरी गाडया सुरु असल्या तरी उत्पन्न प्रमाण जमवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणाहून उत्पन्न चांगले येत असले तरी इतर ठिकाणाहून उत्पन्नाचा स्रोत कमी असल्याने मेढा आगार प्रमूखांना गाडया सोडताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. सातारावरून चांगली मदत मिळत असल्याने हे शक्य होत असून जर काही अडचण निर्माण झाली तर मेढा आगाराविषयी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.