माजी सैनिक व माजी सैनिक विधवांसाठी मेडीकल कँपचे आयोजन

सातारा  : सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक व माजी सैनिक विधवांसाठी आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेज , पुणे मार्फत दि. 9 डिसेंबर 2017 रोजी ई.सी.एच. एस.पॉलीक्लिनिक, सदर बाजार, सातारा येथे मेडिकल कँपचे अयोजन करण्यात आले असून, या मेडीकल कँप मध्ये ओरल कँसर स्क्रिनिंग व दातांचे उपचार (डेंटल चेक अप ) करण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ले.कर्नल आरआर.जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , सातारा यांनी केले आहे.
00000