Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीजिल्हा रुग्णालयात सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 4 ते 6 या...

जिल्हा रुग्णालयात सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत मिळणार परराज्यात जाणाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र

सातारा दि.9 ( जि.मा.का ) उद्यापासून परराज्यात जाणाऱ्या लोकांची वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी दररोज (रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा ) सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते ६ या वेळेत जिल्हा रुग्णालय सातारा येथील आयुष विभागात रोटेशन (चक्राकार)पध्दतीने ३ डॉक्टर व ३ पॅरामेडिकल स्टाफ कार्यरत असेल.
शिवाजी काॅलेज सातारा येथील तपासणी जिल्हा रुग्णालय आयुष विभागात सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या  आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.
डॉ चंद्रकांत काटकर हे पथकप्रमुख असतील व डॉ रूतूराज देशमुख व्यवस्थापक(मॅनेजर) म्हणून काम पाहणार आहेत, यांच्या ड्यूटीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी
https://twitter.com/satara_dio
https://www.facebook.com/dio.satara
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular