अर्जेंर्टिनाचा फुटबॉलवर लियोनल मेस्सी याला 21 महिन्याचा तुरूंगवास…

 

नवी दिल्ली : अर्जेंर्टिनाचा फुटबॉलर लियोनल मेसीला टॅक्स चुकवेगिरी प्रकरणात स्पेनच्या कोर्टाने 21 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने ही शिक्षा तीन टॅक्सच्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर दिली आहे.
अर्जेंर्टिनाकडून खेळणारा हा खेळाडू स्पेनमधील एका व्यवहारात अडकला.  अर्जेंर्टिनाममध्ये जन्मलेला मेस्सी लहानपणी गˆोथ हार्मोनमुळे पीडित होता. त्याच्या शरिराचा विकास थांबला होता. केवळ 4 वर्षाच्या वयात त्याला फुटबॉलचं वेड लागले. 11 व्या वर्षी त्याला हा आजाराची माहिती झाली.
नुकताच घेतली निवृत्ती
चिलीविरूदध कोपा अमेरिका 2016मध्ये झालेल्या पराभवानंतर अर्जेंर्टिनाचा कर्णधार लियोनल मेसी याने खेळाला रामराम ठोकला. चार फायनल गमावल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला.
आपल्या शानदार करिअरमध्ये त्याने पाचवेळा सर्वेश्रेष्ठ फुटबॉलरचा खिताब जिंकला. त्यानं तीन वेळा युरोपीय गोल्डन शूज चा किताब जिंकला.