कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यात ठेकेदाराच्या ‘लावलीजाव’ कामामुळे पाणी वाया

कामाच्या बीलासाठी पाटबंधारे खात्याकडे राजकीय तगादा * वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार; अर्जुनराव शेडगे
म्हसवड : गोंदवले खुर्द येथे कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यात ठेकेदाराने केलेल्या ‘लावलीजाव’ कामामुळे पाणी वाया जात असून निकृष्ट प्रकारचे काम करुन ही ठेकेदाराने कामाच्या बीलासाठी पाटबंधारे खात्याकडे राजकीय तगादा लावला आहे मात्र या याबाबत वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच अर्जुनराव शेडगे यांनी सांगितलं आहे.
माण नदीवर कुकडी पाटबंधारे प्रकल्प जिहे-कठापुर अंतर्गत अकरा बंधारे असून, या बंधार्‍याच्या दारांमध्ये लोखंडी फळ्या टाकून बंधारा पॅक करण्याचं काम वाई येतील एका संस्थेला मिळालं आहे. या संस्थेने हे फळ्या वेळेत बसवणे गरजेचे होते मात्र ते काम त्यांनी वेळेत केले नव्हते त्यामुळे बंधार्‍यांतुन पाणी मोठया प्रमाणत वाहून गेले व कोरडे पडले हे बंधारे दुष्काळी भागात शेतीला पाणी मिळण्या साठी बांधले आहेत ह्या बंधार्‍याची देखभाल करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर आहे. दरवाजे न बसवल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. बंधार्‍यांमुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत आहे माणगंगा नदीवर असलेल्या अशा अनेक कोल्हापुरी पध्दतीच्या बंधार्‍यांतुन पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत होता हे पाणी पूर्णता वाया गेले आहे, सध्या उरमोडी मधून पिंगळी तलाव भरण्यासाठी पाणी सोडले असून यादव मळ्यात असणारा कच्चा कॅनॉल थोडा फुटल्याने पाणी माण नदीत सोडले आहे मात्र माण नदीत असणारे बंधारे व्यवस्तीत न आडवल्याने हे ही पाणी वायाच जात आहे लोकांना याचा म्हणावा असा फायदा होणार नाही.
दरवर्षी या कामावर लाखो रुपये खर्च करून काय उपयोग? दरवर्षी पाटबंधारे विभाग ठेकेदारा मार्फत दरवाजे बसवते यावर्षी पण वाईच्या एका ठेकेदाराला माण आणि खटाव तालुक्यातील वीस बंधार्‍याच्या फळ्या बसवण्याचे काम देण्यात आले आहे. त्याप्रमाणे त्यांनी सध्या फळ्या बसवल्या आहेत पण कोणत्याही प्रकारच टेक्निक यात वापरलं गेलं नाही दोन फळ्यां मध्ये अनेक ठिकाणी अंतर असल्याने हे लाव लीजाव काम आहे. सध्या ढगाळ वातावरण येत असून कदाचित पाऊस पडला आणि पाणी साठा झाला तरी या फळ्या मधून पाणी वाहूनच जाणार आहे त्यामुळे या बंधार्‍यात पाणी साठेल अस वाटत नाही. हे काम करत असतात पाटबंधारे विभागाचे कोण तरी सुपरवायझर असणे गरजेचे होते. ते असते तर किमान काम चांगले झाले असते असे शेतकर्‍यांनी सांगितले .
बंधारा पॅक करण्यासाठी नवनवीन साधनं?
बंधारा पॅक करण्यासाठी लोखंडी फळ्या सिमेंटच्या पिलर मध्ये घातल्या जातात त्यातुन पाणी जाऊ नये म्हणून फाटक्या वाकळा, कुजलेली प्लास्टिक पोती, खराब झालेली बारदाने असे साहित्य वापरलं गेलं आहे. हे योग्य आहे का? याबाबत ठेकेदार येवले यांना विचारले असता ते म्हणाले असलेच साहित्य वापरावे लागते मी याच खात्यातून निवृत्त झालो आहे त्यामुळे माझा सगळा चांगला अभ्यास आहे. याची पाहणी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात यावी.
सुभाष खाडे
उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग
दरवर्षी शासना कडून टेंडर मागवून हे बंधारे पॅक केले जातात मात्र या वेळी टेंडर उशिरा मंजूर झाल त्यानंतर त्यांनी काम केलं आहे याच कामाची आम्ही आता पाहणी करणार आहोत काम योग्य नसेल तर आम्ही ते पूर्ण व्यवस्तीत केल्या शिवाय त्यांच बील देऊ शकत नाही .
श्री अर्जूनराव शेडगे
माजी सरपंच गोंदवले खुर्द
हा बंधारा गावाच्या वरील भागात असल्याने याचा मोठा फायदा अर्ध्या गावाला व शेतीला होतो मात्र हे काम अतिशय निकृष्ट झाले असून संबंधित ठेकेदाराने जर काम व्यवस्तीत नाही केलं तर आम्ही सगळे शेतकरी वरिष्ठांच्याकडे तक्रार देऊन उपोषण करणार आहोत.