परिश्रमाशिवाय ध्येय शक्य नाही : रेखा काळे

म्हसवड : प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:कडे असणार्‍या गुणवत्तेस योग्य अशा परिश्रमाची जोड दिल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते, असे मत पी. एस. आय. पदी निवड झालेल्या रेखा प्रभाकर काळे हिने व्यक्त केले.
गोंदवले बुद्रुक येथील नवचैतन्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या रेखा प्रभाकर काळे हिची पी. एस. आय. पदी निवड झाल्याबद्दल विद्याथ्यार्र्च्यावतीने तीचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना तीने हे मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळा समितीचे सदस्य डॉ. रज्जाक तांबोळी, पर्यवेक्षिका सौ. आर. एल. मोकाशी, प्रा. अजितराव पाटील, प्रा. सदानंद गुंजवटे, प्रा. आर. एल. मोकाशी, प्रा. सौ. सुनिता मांडवे, शिक्षक उपस्थित होते.यावेळी रेखा काळे म्हणाल्या, माझ्या घरची परिस्थिती बेताची आहे. परिस्थितीचे कारण न देता माझ्याकडे असणार्‍या गुणवत्तेस मी कठोर परिश्रमाची जोड दिली.त्यामुळे आजचे यशमला मिळाले आहे. माझ्या यशामध्ये माझ्या आई वडीलांबरोबर या विद्यालयाचा मोठा वाटा आहे. आज या विद्यालयात मी शिक्षण घेतले. त्याच विद्यालयात माझा पहिला सत्कार होत आहे. ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.  यावेळी पर्यवेक्षिका सौ. मोकाशी म्हणाल्या, आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिध्द करताना दिसत आहेत. आपल्याच विद्यालयाची विद्यार्थीनी रेखा काळे हिने राज्यातील 1240 मुलींच्यामध्ये या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. तीचा आदर्श सर्व मुलींनी घ्यावा. यापूर्वी तीची पोलीस म्हणून निवड झाली होती. परंतु तीला अधिकारी व्हायचे होते. यासाठी तीने कठोर परिश्रम करुन ते यशसाध्य केले.