Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीसातारा येथे 8 ते 18 डिसेंबर पर्यंत सैन्य भरती 

सातारा येथे 8 ते 18 डिसेंबर पर्यंत सैन्य भरती 

सातारा :  सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर यांनी माहे डिसेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 6 जिल्हे व गोव्यातील 2 जिल्ह्यांमधील पात्र उमेदवारांसाठी  दि. 8 ते 18 डिसेंबर दरम्यान सातारा येथे छत्रपती शाहू जिल्हा स्पोर्टस् ग्राऊंड, आणि पोलिस परेड ग्राऊंड येथे सैन्य भरती रॅली आयोजित केली आहे. यामध्ये सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर क्लार्क/ स्टोअर किपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेडस्मन,  सोल्जर टेक्निकल एव्हिएशन/एम्युनेशन या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रथम ुुु.क्षेळपळपवरपरीाू.पळल.ळप  या वेबसाईटवर दि. 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरुन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. भरती स्थळावर भरती रॅलीमध्ये फक्त डमिट कार्ड असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल. डमिट कार्ड उमेदवारांना दि. 23 नोव्हेंबर 2017 रोजी उमेदवारांच्या ई मेलवर पाठविले जाईल. यासाठी उमेदवारांनी आपले ई मेल वेळोवेळी तपासावेत. उमेदवारांनी त्यांच्या डमिट कार्डवर नमुद केलेल्या दिवशी व वेळी पोलिस परेड ग्राऊंड सातारा येथे हजर रहावे. नमुद तारखेशिवाय उमेदवार उपस्थित असल्यास त्याला प्रवेश दिला जाणार नाही. भरतीची तारीख, जिल्हा पुढीलप्रमाणे आहे.
दि. 8 डिसेंबर 2017 रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्य. दि. 9 व 10 डिसेंबर सांगली, दि. 11 व 12 डिसेंबर सोलापूर. दि. 13 डिसेंबर रोजी वैद्यकीय चाचणी. दि. 14 व 15 डिसेंबर सातारा. दि. 16 डिसेंबर सातारा, कोल्हापूर. दि. 17 डिसेंबर कोल्हापूर. दि. 18 डिसेंबर कोल्हापूर सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर टेक्नीकल, सोज्लर टेक्नीकल एव्हिएशन, सोल्जर क्लार्क/ स्टोअर किपर टेक्नीकर, सोल्जर ट्रेडस्मन आणि बाहेरील उमेदवार आणि आरटी जेसीओ (रिलीजीयस टिचर महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य यासाठी). दि. 19 ते 22 डिसेंबर 2017 पर्यंत फक्त वैद्यकीय चाचणी.
अधिक माहितीसाठी आर्मी रिक्रुटींग ऑफिस, कोल्हापूर दूरध्वनी क्र. 0231-2606419 येथे संपर्क साधावा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular