अत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे

सातारा : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल झालेले पहायला मिळतात. त्याच धर्तीवर अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीमध्येही बदल करण्यात आला असून सूत गिरणीमध्ये नवीन अद्यावत आणि अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे. यामुळे सूत गिरणीमध्ये सर्व प्रकारचे उच्चतम दर्जाचे सूत उत्पादन होणार असून सूत गिरणीचा नावलौकिक अधिकच वाढेल, असा विश्‍वास कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला. 
वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीमध्ये अद्ययावत परदेशी मशिनरी अ‍ॅटोकोनर सॅव्हीयो पोलार इको पल्सर, इटली ही मशिनरी बसवण्यात आली असून या मशिनरीचे पुजन आणि शुभारंभ सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी गिरणीचे चेअरमन रामचंद्र जगताप, व्हा.चेअरमन हणमंत देवरे, माजी चेअरमन विष्णू सावंत, माजी व्हा. चेअरमन गणपतराव मोहिते,  संचालक उत्तमराव नावडकर, लक्ष्मण कदम, जगन्नाथ किर्दत, सुरेश टिळेकर, बळीराम देशमुख, अशोक काठाळे,  रघुनाथ जाधव, भरत कदम, सुनिल देशमुख, भगवान शेडगे, संचालिका सौ. साधना ङ्गडतरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अजिंक्यतारा सूत गिरणीमध्ये सर्व प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे सूत निर्मीती करण्यांत येत असून त्यामध्ये, स्लबयार्न, कोम्बड कॉम्पेक्ट यार्न, कार्डेड वार्प आणि होजेरी यार्न इत्यादी प्रकारचे सूत उत्पादन शक्य झाले आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची अद्ययावत मशिनरी गिरणीमध्ये बसविण्यांत आली असून सूताचा दर्जा अधिकच चांगला झाला आहे. तसेच गिरणीने अद्यायावत मशिनरी बसविल्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे सूत निर्मीती करून परदेशी बाजारपेठेतही नावलौकीक मिळवला आहे. सध्या अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीमधील सूत चायना तसेच कोलंबीया इत्यादी देशामध्ये निर्यात होत आहे.
मशिनरीच्या शुभारंभप्रसंगी गिरणीचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, चीङ्ग अकौंटंट मानसिंग पवार, प्रॉडक्शन मनेजर शैलेश जानकर, मिल इंजिनीयर प्रदीप राणे, एच.आर. मॅनेजर राजेश दिक्षीत आदींसह स्टाङ्ग, कामगार व महिला कामगार उपस्थित होते.