कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

सातारा : सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी भाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकार्यक्षम व अन्याययकारी राज्य सरकार बाबत घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरुच राहिल असे जाहिर केले. हा आंदोलनाचा दुसरा टप्पा होता. तरीही शासनाने दखल घेतली नाही तर 18 जानेवारी रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा नेहण्यात येईल. या आंदोलनावेळी प्रा. दत्तात्रय धर्मे, प्रा. अविनाश लेवे, प्रा. पी. एस. गायकवाड यांनी आंदोलन करत्यांना मार्गदर्शन केले. शेवटी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये बदली बढती सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदे लवकरात लवकर भरुन इ. 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. अनुदान पात्र विना अनुदानितला टप्पा अनुदान द्यावे. नियुक्त शिक्षकांना मान्यता देवून त्यांचे पगार सुरु करावेत. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य शिक्षकांना नोकरीची हमी द्यावी. 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करावी. सेवेतील घड्याळी तासावरील, अर्धवेळ शिक्षकांना अभियोग्यता चाचणीतून वगळावे. त्यांना सेवाजेष्ठतेनुसार नियुक्ती देण्यात यावी. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ करावी. नीट जी ची परिक्षा केंद्र सेट प्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी असावीत. अशा विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तिव्र भावना शासनास कळविण्याचे जिल्हाधिकार्‍यांना आव्हान केले.
सदर आंदोलन जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश देसाई व सरचिटणीस प्रा. पाटील, बी. बी. यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनामध्ये प्रा. गुरव, प्रा. ऐवले, प्रा. आर. एनस. शिंदे, प्रा. जगदाळे, प्रा. नलवडे, प्रा. बोधे, प्रा. यादव, प्रा. वसावे, प्रा. पाटील, प्रा. आर. एस. शिंदे, प्रा. हाडवे सर यांनी सक्रिय सहभाग घेतला.