१ डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्ट टॅग होणार अनिवार्य

मुंबई :  १ डिसेंबरपासून चारचाकी वाहनाला फास्ट टॅग लावणे हे बंधनकारक होणार आहे. केंद्र सरकाने गुरूवारी काढलेल्या अधिसूचनेत याची माहिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्रालयातर्फे याआधीच ही पद्धत लागू करण्यात आली होती.
परिवहन मंत्रालयाच्या सुचनेनंतर सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग लावण्यात येणार आहेत.
फास्टॅग लावलेल्या चारचकी वाहनांना टोलच्या रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही. फास्टॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टॅग पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. यामुळे टोल प्लाझावरच्या लांबच लांब रांगांपासून सुटका होण्यास मदत होणार आहे .