माझ्या उमेदवारी बाबतीत मतदार संघातील लोकांच्या कडून प्रचंड मागणी: ना. नरेंद्र पाटील

पाटण : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात आढावा बैठकांसाठी फीरत असताना गेल्या दहा वर्षांत खासदार फंडातून कोठेही विकास काम झालेचे ऐकीवात नाही. लोकांना आता नावासाठी खासदार नको आहे. तर विकासकामे आणि लोकांची कामे करनारा खासदार पाहिजे. माझ्या उमेदवारी बाबतीत सातारा मतदार संघातील लोकांच्या कडून प्रचंड मागणी आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास सातारा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी पाटण येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जागतिक पातळीवर दबदबा निर्माण झाला आहे. यापूर्वी या देशावर अनेक अतिरेकी हल्ले झाले. त्याला कधीही प्रतिउत्तर देण्यात आले नाही. 26/11 चा हल्ला त्याचे एक उदाहरण आहे. या हल्ल्यात 200 निष्पाप नागरीकांसह अनेक पोलीस जवान शहिद झाले. तरी त्यावेळच्या सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र नरेंद्र मोदी यांनी ज्या-ज्या वेळी देशावर असा हल्ला झाला. त्यावेळी अतिरेक्यांना चोख प्रतिउत्तर दिले. सर्जिकल स्ट्रैक, आताचा हवाई हल्ला या दोन्ही हल्ल्यात पाकिस्तानातील अतिरेक्यांची अड्डे उधवस्त करून टाकले. तर पाकिस्तानी लष्कर विमानाला परतून लावताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेलेला भारतीय कंमाडर अभिनंदन याला केवळ 60 तासात मायदेशी परत आणला. आज देशाला सुरक्षेतेची गरज आहे. ते केवळ नरेंद्र मोदीच देऊ शकतात.
मराठा समाजाच्या नवी मुंबई येथील आंदोलनात शहिद झालेला पाटण तालुक्यातील युवक रोहण तोडकर याच्या कुटूबियांना शासनाने जाहीर केलेली पूर्ण मदत देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून ती लवकरच त्याच्या कुटूबियांना मिळेल. तर त्याच्या मारेकर्‍यांना जास्ती- जास्त शिक्षा होण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा नवीन उध्दोग, व्यवसायांना खरा लाभ मिळाला पाहिजे. अण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाची योजना आणि त्याची नियमावली काय आहे. हे समजण्यासाठी बँक आणि नागरिक यांची एकत्र आढावा बैठक तालुक्याच्या ठिकाणी घेतली. मराठा समाजातील तरुणांना या कर्ज योजनेत कोणतेही अडचण निर्माण होणार नाही. यासाठी जल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याच्या एक दिवस महामंडळाचा अधिकारी बसेल आणि तो मार्गदर्शन करेल. कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या बाबतीत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले कोयना प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षाची प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. कोयना येथे सुरू असलेल्या आंदोलना बाबतीत आता अंतिम निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करून विनंती करणार आहे असे त्यांनी सांगितले.