नवतरुण दुर्गात्सव मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

म्हासुर्णे (प्रतिनिधी  तुषार माने) :– म्हासुर्णे ता.खटाव येथे सालाबादप्रमाणे सध्या जल्लोषात सुरू असलेल्या दुर्गाउत्सवाचा लाभ संपुर्ण देशभरात भाविक भक्त घेत आहेत प्रत्येक वर्षी म्हासुर्णेतील नवतरुण दुर्गामाता मंडळाकडुन विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवुन सामाजिक प्रयत्न केला जातो. या वर्षी मंडळाने म्हासुर्णेतील नवतरुण मंडळातील कार्यकर्त्यांच्या व लहान मुलांच्या कलागुंणाना वाव मिळावा म्हणून विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होता. या कार्यक्रमामध्ये मनोरंजन,नाटक,गाणे, प्रबोधन करण्यात आले.हा कार्यक्रम नवतरुण नवरात्र मंडळाने आयोजित केल्यामुळे लहान लहान मुला मुलींना आतापासुनच कला व वेशभुषेचे ज्ञान आत्मसात होत आहे.या कार्यक्रमात शेतकरी गिते,जुनी गाणे,धार्मिक गिते अशा पध्दतीच्या गितांनी सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सर्व उपस्थित ग्रामस्थांनी सर्व गाण्यांना टाळ्याच्या गजरात दाद दिली. या कार्यक्रमात विशेष म्हणजे नवतरुण दुर्गात्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी आपली कला दाखवली त्यामध्ये विठ्ठल माने,नामदेव माने,विक्रम माने,विकास माने,शाम माने,विक्रांत माने,प्रथमेश औताडे,सुमित कुलकर्णी ,अभिजित महानवर यांनी सादर केलेल्या कलेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.सादर केलेल्या नाटकाचे म्हासुर्णे गावातील ग्रामस्थांकडुन कौतुक होत आहे अशाच प्रकारे कार्यक्रम नवतरुण मंडळाच्या वतीने व्हावीत अशी ग्रामस्थांच्याकडुन चर्चा होत आहे.मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.हा संपुर्ण सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी मंडळाचे अध्यक्ष संदिप माने,विठ्ठल माने,सचिन माने,विठ्ठल यमगर,नामदेव माने,संतोष माने,मधुकर मंडले यांनी विशेष परिश्रम घेतले.