बेरोजगारांच्या प्रश्नावर युवक राष्ट्रवादीचा सातार्‍यात मोर्चा

सातारा ः केंद्र व राज्य सरकारने बेरोजगार तरुणाची फसवणूक केली आहे. उलट 55 हजार नोकर्‍या कमी झाल्याने  कुशल, अकुशल कामगार बेकार झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सातार्‍यात जिल्हाध्यक्ष तेजस शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालतावर मोर्च्या काढण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी सतीश बारावकर यांना निवेदन दिले
देशातील विविध ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्षाला दोन कोटी नोकर्‍या देण्यात येणार आहे असे सांगत आहेत पण, प्रत्यक्षात बेरोजगारी वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक निराशाजनक जीवन जगत आहेत. दुसर्‍या बाजूला कौशक्य विकास योजनेचे काम सुरू केले त्या संस्थेचे वेतन मिळाले नाही. शासकीय सेवेत सध्या नोकर भरती प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती करून राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते,पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे युवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच सातारा जिल्ह्याधिकारी कार्यालय भवन येथे काचेचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यामुळे पोलीस व कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पहाण्यास मिळाली होती.या मोर्चात कामेश कांबळे, समीर घाडगे, गोरखनाथ नलवडे, स्वप्नील डोंबे, विक्रांत शिर्के, बाळासाहेब महामुलकर, व मलेश मुलगे-पाटील असे मोजके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सातारा शहर व तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिले नव्हते याची खाजगीत चर्चा सुरू झाली आहे.