Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीमाढा लोकसभेसाठी रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपचा उमेदवार जाहीर

माढा लोकसभेसाठी रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपचा उमेदवार जाहीर

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. बारामतीशी संघर्ष झाल्यानेच काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी मिळेल की नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. भाजपकडून माढ्यासाठी रोहन देशमुख यांच्या नावाचाही विचार सुरू होता. मात्र संजय शिंदे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने नाईक-निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडुन कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती. परंतु आज अखेर माढा मतदारसंघासाठी भाजपनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. माढ्यातून रणजितसिंह निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी भाजपनं आज जाहीर केली असून यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढ्यात आता भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष पदी असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळीच त्यांना माढ्यातून उमेदवारी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता माढा तर शंभर टक्के जिंकणारच, पण सोलापूर, सातार्‍याच्या जागेचेही आता काहीच प्रॉब्लेम उरला नाही असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते.
दरम्यान गेली काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा तिढा पहावयास मिळाला. भाजपकडून माढ्यात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजपने मोहिते पाटील पिता पुत्रांऐवजी तिसर्‍याच उमेदवाराला तिकीट जाहीर केलं आहे.काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मोहिते पाटील पिता पुत्रांना तयार राहण्याचे आदेश दिले होते. रणजितसिंह मोहिते-पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागांचा समावेश आहे. पण आज अचानक सर्व अंदाज खोटे ठरवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. या उत्तर-पूर्व भागांतच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची आता चर्चा आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची यांची उमेदवारी जाहीर होताच फलटण मध्ये कार्यकर्त्यांनी फटाके व पेढे वाटून आनंदोत्सव केला.
कल्याण काळे भाजपच्या वाटेवर
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे लढताना माढामधून 65 हजार मते मिळवणारे कल्याण काळे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी भाजपप्रवेश केल्यास आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांचा मार्ग आणखी खडतर होणार आहे. काँग्रेस नेते आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार बबन शिंदे यांच्याविरोधात लढून 65 हजार मते मिळवलेले कल्याण काळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचे समजते. पुढील तीन-चार दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. काळे यांना भाजपमध्ये घेऊन आघाडीला मोठा दणका देण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. काळे हे भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत, असं मानलं जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular