साताऱ्यात ६० लाखांच्या नव्या नोटा जप्त, एलसीबीची कारवाई

सातारा – पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या तिघांना आज  सकाळी सातारमधून अटक करण्यात आली. यांच्याकडून 60 लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा जप्त कऱण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली. सागर दत्तात्रय आरडे, भगवान बिराप्पा भोपळे (राजारामपुरी कोल्हापुर) उमेश कांबळे (कोळे, ता. कराड) हे तिघे होंडा सीटी गाडीतून साताऱ्यातील बॅाम्बे रेस्टॅारंट चौकात जुन्या नोटा बदलुन देण्यासाठी  आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पदमाकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडुन ६० लाख रुपए किमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.  हे तिघे जण जुन्या नोटा तीस टक्के दराने बदलुन देत होते. प्राप्तीकर विभागाच्या मदतीने पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. तसेच गैरप्रकारे नोटा बदलून देणाऱ्यांची माहिती संगणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस पोलिस अधिक्षकांनी जाहिर केले.