सौ.संगिता शेवाळे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार

कराड : येथील स्व.शे.रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाळेतील विज्ञान विभाग प्रमुख सौ.संगिता शेवाळे यांना अविष्कार सोशल फौंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
येथील वेणूताई चव्हाण सभागृहात अविष्कार सोशल फौंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रसिध्द साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे यांच्याहस्ते सौ.संगिता शेवाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कराड अर्बन कुटूंबप्रमुख सुभाषराव जोशी, डॉ.सुभाष एरम, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, चाटे शिक्षण समुहाचे रमेश बनकर, अविष्कार फौंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांची उपस्थिती होती.
सौ.शेवाळे यांनी लाहोटी कन्या प्रशालेमध्ये उपशिक्षिका तसेच विज्ञान विभागप्रमुख म्हणून उल्लेखनीय काम केले. विशेषत: इन्स्पायर अवार्ड, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, विज्ञान हस्तलिखीत स्पर्धेत त्यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी राज्य व राष्ट्रीयस्तरापर्यंत चमकले आहेत. प्रशालेच्या सर्व उपक्रमात सहभाग घेवून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या शिक्षण मंडळ कराडच्या मार्फत स्थापन केलेल्या महर्षी कणाद सायन्स अ‍ॅकॅडमीत त्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. प्रशालेमध्ये अनेक पर्यावरणपुरक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केलेले आहे. सौ.शेवाळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्ष वाळींबे, सचिव चंद्रशेखर देशपांडे, संचालक भागवत, लाटकर, मुख्याध्यापिका शर्मिला बायस, उपमुख्याध्यापक वांगीकर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.