जिल्ह्यात मी नवखा नाही, माझा विजय निश्‍चित : नरेंद्र पाटील

कराड : पाटण तालुका माझे होम पीच आहे. कराड दक्षिण-उत्तरला मी नवका नाही, जावली हे माझे माहेर घर आहे. कोरेगांव तालुक्यात माझे मोठ्या प्रमाणात मित्र आहेत. पाचगणी-महाबळेश्‍वर येथे माझे नातेवाईक आसून मेढ्यात माझे माथाडी कामगार आहेत. शिवसेना भाजप सर्व जिल्ह्यात आहे. मित्रपक्षाची साथ आहे.त्यामुळे माझा विजय ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असा आत्मविश्‍वास सेना भाजप मित्रपक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी नितीन बानुगडे-पाटील,भाजपचे जिल्हाअध्यक्ष विक्रम पावस्कर, उद्योगपती पुरूषोत्तम जाधव, मनोज घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह अनेक सेना-भाजप मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्ते उपस्थितीत होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, मी सातारा जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्यामुळे मला जिल्ह्यातील समस्याची जाण आहे. त्यामुळे समस्या सोडविण्याला माझे प्राथमिक प्राधान्य राहिल. माथाडी कामगार युनियन, आमदारकीच्या माध्यमातुन आजपर्यंत अनेक समाजाभिमुख व वैयक्तिक कामे केली आहेत. आता स्व.आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कामे करीत आहे. मी राष्ट्रवादी पक्षात होतो तरीसुध्दा आघाडी सरकारच्या काळात माथाडी कामगारांचे प्रश्‍न प्रलबिंत राहिले. राष्ट्रवादीनेही ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.विद्यमान भाजप -सेनेच्या राजवटीत खोळंबिलेली कामे मार्गी लागली. त्यामुळे मी भाजपाला पसंती दिली. परंतु सातारा लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्याकडे माझे मागणी करुन मला उमेदवारी दिली आहे. मी पाटण तालुक्याचा रहिवाशी आहे. मला माथाडी कामगार सेना-भाजप मित्रपक्ष यांचा पाठिबां आहे. तसेच माझे इतर पक्षातही मित्र आहेत. सर्व सामान्य शेतकरी कुंटुंबातील मी उमेदवार असल्याने मला सर्व सामान्य मतदाराची पसंती राहणार आहे. तेव्हा माझा विजय ही काळ्या दगडावरील रेग आहे.
लोकसभेच्या या निवडणुकीत मी विजयी झाल्यावर प्रथम तरूण-तंरूणीच्या हाताला काम, जिल्ह्यातील टोलमुक्ती, पर्यटनाच्या माध्यामतुन उद्योग निर्मिती तसेच सातारा येथील मेडीकल कॉलेच्या कामाला गती देऊन सर्व सामांन्यांच्या हिताचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. यापुढे जिल्ह्यात दादागिरी चालु देणार नाही. महिल्याच्या अत्याचारित प्रश्‍नाकडे गांर्भीयांने लक्ष दिले जाईल.
नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, आज देशाच्या सीमेवर पाकिस्तान अगळीक करीत आहे. चिनची भारत विरोधी भुमिका आहे. अशा परिस्थितीत स्थिर सरकारची गरज आहे. त्यासाठी भाजप हाच पर्याय आहे. असे सांगून ते म्हणाले, विरोधी पक्ष म्हणजे बारा जणांचे बाजले आहे. त्याला धरबोळ नाही. तेव्हा ते देशाला स्थिर सरकार देऊ शकत नाहीत. आघाडी सरकारने आजपर्यंत देशातील गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही.मात्र होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातुन ते आता गरीबी हाटवचा नारा देत आहेत. तेव्हा मतदारांनी आपले आमुल्य मत देऊन भाजप -सेनेच्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे.