रस्त्याच्या कामासाठी होणार्‍या अवैध वाहतुकीवर रोख लावा;

अन्यथा आंदोलन; रयत क्रांती संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
औंध : खटाव तालुक्यातील औंध, गोपुज, जायगाव असे रस्त्याचे काम सुरू असून ह्या रस्त्याच्या कामासाठी होणारी खडी व अन्य मालाची वाहतूक अवैध होत असून त्यामुळे अपघात होत आहेत त्यामुळे आहे त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. प्रशासनाने अवैध वाहतुकीवर रोख लावावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर जगदाळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाने रस्त्याची कामे सुरू केली आहेत मात्र त्या नावाखाली ठेकेदार लोकांची गैरसोय करत आहेत. गेली अनेक दिवस औंध-गोपुज रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे, त्यामुळे लोकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे, खडी क्रशर व त्याची होणारी वाहतूक यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे त्यामुळे अनेक वाहनधारक घसरून पडले आहेत, सदरच्या कामात लक्ष घालून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रति सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस ठाणे यांना प्रति देण्यात आल्या आहेत.