माण तालुक्यातील विक्रम शेंडगेची नेपाळ येथे होणार्‍या कब्बड्डी स्पर्धेसाठी इंडिया कबड्डी टिमच्या कॅप्टनपदी निवड

म्हसवड : माण तालुक्यातील एका गरिब मेंढपाळ कुटुंबातील दिव्यांग असलेल्या विक्रम शेंडगे यांची नेपाळ येथे होणार्‍या परा कबड्डी स्पर्धेसाठी इंडिया कब्बड्डी टिमच्या कॅप्टन पदी निवड झाली असून, प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रच्या वतीने विक्रम यास आर्थिक मदत केली असून त्याला अजूनही मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनीही सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रच्या चेअरमन नलिनी कोळी यांनी केले आहे.
म्हसवड (मासाळवाडी) येथील मेंढपाळ कुटुंबातील दिव्यांग असलेल्या विक्रम शेंडगे यांची नेपाळ येथे होणार्‍या परा कब्बड्डी स्पर्धेसाठी इंडिया कब्बड्डी टिमच्या कॅप्टन पदी निवड झाली असून त्यांस प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रच्या चेअरमन नलिनी कोळी यांनी नेपाळला जाण्यासाठी लागणारा विमान प्रवासाचा सर्व खर्चीची रोख रक्कम दिली आहे.
विक्रम शेंडगे, हा ग्रामीण भागातील मुलगा असून दिव्यांग नॅशनल खेळाडू आहे. गेली चार वर्षे राज्यस्तरीय दिव्यांग खेळामध्ये भाग घेऊन सुवर्ण, रजत,कांस्य पदके मिळवत माण तालुक्याचे व जिल्हा च्या नाव लौकिकात भर घातली आहे परा कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया कडून इंटरनॅशनल इंडिया कब्बड्डी टिमच्या कॅप्टन पदी निवड झाली असून, आत्ता नेपाळ येथे होणार्‍या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी सिलेक्सन झाले असून हलाखीची परिस्थिती आडवी येत आहे इतर खर्च झेपणार नाही. सामाजिक संस्थांनीही व दानशूर व्यक्तीनी दिव्यांग असलेल्या विक्रम शेंडगे यास फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी असे आवाहन नलिनी कोळी यांनी केले आहे.