Tuesday, April 16, 2024
Homeठळक घडामोडीकाँग्रेस-राष्ट्रवादीने रखडवलेले प्रकल्प भाजपा सरकारने पूर्ण केले : उदयनराजे भोसले

काँग्रेस-राष्ट्रवादीने रखडवलेले प्रकल्प भाजपा सरकारने पूर्ण केले : उदयनराजे भोसले

मेढा : काँग्रेस-राष्ट्रवादी कडे जनतेने कित्येक वर्षे सत्ता देणे मात्र या सरकारने लोकांची फसवणूक करण्याचे काम केले या सरकारच्या काळात कित्येक वर्षे प्रकल्पाची कामे अपूर्णावस्थेत राहिली ही कामे भाजप सरकारच्या काळात मार्गी लागले असून आगामी काळात भाजपच स्थिर सरकार देऊ शकते असे प्रतिपादन श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले दरम्यान सातारा जावली मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले आणि मी एकत्र प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले.
महायुतीतील लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले व विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळ ता.जावली येथील मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ, माजी शिक्षण सभापती अमित कदम, माजी सभापती सुहास गिरी, जि.प. सदस्या सौ. अर्चनाताई रांजणे, विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ,रिपाईचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, युवानेते ज्ञानदेव रांजणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, सुनील काटकर, बाळासाहेब गोसावी,कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे, अशोकराव परामने, शिवसेनेचे प्रशांत तरडे, सौरभ शिंदे, सुजित शिंदे,चंद्रसेन शिंदे, जयदीप शिंदे,नितीन शिंदे, शिवाजी जाधव,सयाजी शिंदे आदी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीची गेली कित्येक वर्षे या राज्यावर सत्ता होती मात्र त्यांनी अनेक प्रकल्प रखडवून ठेवले. लोकांचा केवळ मतासाठी वापर केला. अनेकांनी मोठी पदे भूषवली मात्र जिल्याचा भरीव विकास झाला नाही. जावली तालुक्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असून रोजगार निर्मितीला आपले प्राधान्य राहणार आहे. सातारा जिल्हा विकासात मागे कुणी ठेवला याचा विचार करून महायुतीला साथ द्या. मी कोणाला शत्रू मानत नाही, मी मांडतो तो विचार आणि तो लोकहिताच्या साठीच असतो. मी कोणाचे वाईट केले नाही म्हणूम कॉलर उडवतो. ज्या वेळेस जरंडेश्वर कारखाना केला त्यावेळेस मी सभासद नसतानाही याबाबत आवाज उठवला प्रतापगड काका नाही करण्याचे प्रयत्न होते मात्र त्यात त्यांना यश आले नाही. विकासाच्या बाजूने जायचे ज्यांनी विकासापासून वंचित ठेवले त्यांना साथ द्यायची याचा विचार करणे गरजेचे आहे .शिवेंद्रराजे आणि माझ्याकडून कधीही चुकीचे राजकारण होणार नाही. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन मतदारसंघाचा कायापालट करू, असेही उदयनराजे म्हणाले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, युवक व बेरोजगारांची आर्थिक उन्नती उंचावण्यासाठी जावलीत अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार िाहे. आम्ही दोघे आपणा सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करणार आहे. विरोधी उमेदवार पाच वर्षे सत्ताधार्‍याबरोबर होते मग त्यांना विकास का करता आला नाही, असा सवाल शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
येथील बोंडारवाडी धरणासारखे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प भाजपाच्या माध्यमातून तडीस नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. तसेच कुसुंबी मार्गे रस्ता डांबरीकरण करून मेढा भाग हा कोयनेशी जोडल्याने लोकांच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात उर्वरित विकासकामे करून मतदार संघाचा विकास व प्रश्नांना प्राधान्य देऊ असे ,आश्वासन उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिले.
माजी आ. सदाशिवभाऊ सपकाळ म्हणाले, मतदार संघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रश्नासाठी दोन्ही राजे नेहमीच आपल्या बरोबर असून, जनतेच्या हितासाठी नेहमीच धडपडत आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान दोन्ही राज्यांच्या प्रचारार्थ करहर, कुडाळ येथे राजेंद्र गोळे, ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी राजू गोळे, रामदास पार्टे,योगेश गोळे प्रकाश भोसले, सुरज गोळे,गोपाळराव बेलोसे, गीता लोखंडे, नितीन गावडे, समाधान पोफळे, एकनाथराव इंगळे, यशवंत पवार, रवींद्र परामने आदी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular