मोरणेला पुर मोरणा-गुरेघर धरणातून 1100 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु

पाटण : पाटण शहरासह पाटण तालुक्याच्या विविध भागात गेल्या चार दीवसापासुन मुसळधार पाऊस पडत. आहे मोरणा-गुरेघर धरण 85 टक्के भरल्याने या धरणातुन रविवारी प्रतिसेकंद 1100 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे मोरणा नदीला पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. या. पाऊसाने पाटण शहरासह तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले असुन कोयना नदीवरिल जुना सगंमनगर व मोरणा नदीवरील वाडीकोतवडे येथील जुना पुल पाण्या खाली गेले आहेत. तर पाटण येथी मुळगाव पुलाला पाणी घासुन जात आहे. पाऊसाची सततधार कायम राहिली तर मुळगाव पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
पाटण शहरासह पाटण तालुक्याच्या विविध भागात गले तिन दीवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पडणार्‍या पाऊसामुळे पाटण शहरासह तालुक्यातील कोयना, मोरगिरी, केरा, ढेबेवाडी, मणदुरे, विभागाला चांगलेच झोडपुन काढले आहे. त्यामुळे या ठीकाणचे जनजिवन विसकळीत झाले आहे. मोरणा नदीवरील मोरणा-गुरेघर हे धरण 85 टक्के भरले असून या धरणातुन प्रति सेकंद 1100 शे क्युसेस पाणी नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने मोरणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या नदीवरील वाडि कोतवडे येथील जुना पुल पाण्या खाली गेला आहे. तर कोयना नदीवर असलेला सगंमनगर ( धक्का ) येथी जुना पुल शनिवारी पाण्याखाली गेला होता.
पाटण शहरातील कोयना नदीवरील पाटण – मुळगावला जोडणार्‍या पुलाला पाणी घासुन जात असुन हा पाऊस असाच पडत राहील्यास या पुलावरुण पाणी जाण्याची शक्यता असून यामुळे येथील जनजिवन विस्कळीत होवु शकते. तसेच मुसळधार पाऊसामुळे पाटण शहरातील ठीक ठीकाणि विजेच्या तारा तुटल्यामुळे पाटण शहरासह मोरगिरी, कोयना, मणदुरे, वनकुसवडे डोंगर भागातील अनेक गावे अंधारात होती. विज वारंवार जात असल्याने नागरीकाना अधांरात चाचपडत राहावे लागले आहे. या जोरदार पाऊसात विजवितरण कपंनीच्या कर्मचार्‍यांना विज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.