पुतळा दहनप्रकरणी निषेधार्थ तरडगाव येथे रास्ता रोको

फलटण : ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळा दहन प्रकरणी निषेधार्थ तरडगाव येथे पुणे पंढरपूर रोडवर रास्ता रोको व मोर्चा काढून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला या वेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती या मुळे या घटनेची धग दुसर्‍या दिवशी ही फलटण तालुक्यातील विविध भागात सुरू होती.
नीरा देवघर च्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाने सातारा व फलटण या ठिकाणी दोघांच्या समर्थकांनी आपापल्या नेत्याची बाजू मांडली असून या दोघा दिगग्ज नेत्यांमध्ये जोरदार आरोप केले जात असून ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी आज तरडगाव येथे निषेध फेरी काढून रस्ता रोको करून रामराजे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत काही काळ वाहतूक बंद केली होती.तरडगाव येथील रास्ता रोको मध्ये सुभाषकाका गायकवाड, दिलीपराव अडसूळ, हेमंत कचरे, प्रवीण खताळ (पाटील), पांडुरंग गायकवाड, रोहिदास गायकवाड उपस्थित होते.
तसेच राजुरी ता.फलटण येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले त्याच बरोबर साखरवाडी येथे काळे झेंडे दाखवत निषेध फेरी काढली या मुळे आज ही काही प्रमाणात ना. रामराजे यांचा काल शनिवारी सातारा येथे राजे प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी जाळलेल्या प्रतीकात्मक पुतळ्या मुळे आजही अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.