वाढदिवसाच्या निमित्ताने रात्री फटाके वाजवल्या प्रकरणी गुन्हा

फलटण : वाढदिवस असल्याच्या कारणावरून रात्री फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी येथील चौघांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतीत फलटण शहर पोलीस ठाण्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार राजू शिरतोडे यांचा वाढदिवस होता या मुळे उमाजी नाईक चौक फलटण येथे रात्री 12 च्या दरम्यान तुषार दौलतराव राऊत,राहुल अंबादास गवळी,रोहन सुभाष मदने सर्व रा.उमाजी नाईक चौक फलटण व अभिजित पांडुरंग पवार रा.पवार गल्ली फलटण या चौघांनी फटाके वाजवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी पोलीस ना.शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून 188,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार वीरकर करीत आहेत.
वृद्ध तसेच लहान मुलांच्या अनेक तक्रारी आल्या असून या पुढे रात्री अपरात्री फटाके फोडणार्‍यां विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक पोमन यांनी या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.