जिल्ह्यात विधानसभेच्या आखाड्यासाठी 58 जण इच्छुक

सर्वाधिक इच्छुक फलटणमधून * टोकाचे आंतरविरोध पुन्हा चव्हाट्यावर
सातारा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने भाजपने सातारा जिल्हयात आठ विधानसभा मतदारसंघातून 58 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये 51 पुरूष व 7 महिला उमेदवारांचा समावेश होता. आमदार रवी असोले यांच्या उपस्थितीत सातारा विश्वामगृहात या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीने प्रत्येक जिल्ह्यात इच्छुकांच्या भेटी गाठी चालू केल्या आहेत, या मुलाखती घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रभारी प्रदेश कार्यालयातून पाठवण्यात आले आहेत. रवी असोले, संघटना मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत मुलाखतींचे सत्र पार पाडले.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयारी म्हणून प्रदेश कार्यालयाकडून आमदार अनिलजी सोले याना सर्व आठ मतदार संघातील भाजपा कडून इच्छूक उमेदवारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना मतदारसंघातील त्यानी केलेली कामे, मतदार संघातील समस्या आणि आमदारकीची उमेदवारी का पाहिजे या संदर्भाने इच्छुकाची चाचपणी करण्यात आली .
फलटण तालुक्यात सर्वाधिक इच्छुक फलटण तालुक्यातून सर्वाधिक अकरा उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर वाई तालुक्यात अकरा जणांनी विधानसभा लढण्याची तयारी दर्शवली. फलटणमधून स्वप्नाली शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाची चर्चा झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे व सातार्‍याचे नगरसेवक मिलिंद काकडे यांनी ही राजकीय आखाड्यात उतरण्याचे मनसुबे स्पष्ट केले. सातार्‍यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक पवार, अमित कदम, संतोष जाधव, अभय पवार, स्मिता निकम, सुनिशा शहा यांनी मुलाखती दिल्या. चौकट- दीपक पवार, शिवेंद्र राजे आमने सामने – भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे हटावचा नारा देणारे दीपक पवार व शिवेंद्रराजे भोसले अगदीच आमनेसामने बसले होते. मात्र बापूंच्या आमदार हटाव मेळाव्याच्या संदर्भाने कोणतीच चर्चा झाली नाही. दोघांनीही एकमेकांकडे बघण्याचे टाळले. चौकट- आमच ठरलयं म्हणत आ. जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठी चंग बांधलेले डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी मुलाखतीच्या दरम्यान परखडं मत मांडली. आमदारकीचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपच्या तंबूत दाखल होत आहेत. असे झाल्यास आम्ही गोरेविरोधात प्रचार करणार असा पवित्रा घेतल्याने माण खटाव विधानसभा मतदारसंघातील आंतरविरोध स्पष्टपणे समोर आले.
सदस्यांकडून मतदारसंघ प्रमाणे शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, गट, गण, प्रभाग या सर्वांची माहिती अनिलजी सोले यांनी घेतली या नंतर मतदार संघ प्रमाणे मुलाखतीस सुरवात झाली.
मुलाखत – कोरेगाव मतदार संघातून महेश शिंदे, संतोष( भाऊ) जाधव, विवेक(अप्पा) कदम, रणजित फाळके, प्रभाकर साबळे, रमेश माने, सौ. सुवर्णा राजे, कराड उत्तर मधून मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ ,सयाजीराव पाटील,विश्वासराव सावंत,हिंदुराव चव्हाण,रामचंद्र चव्हाण,सागर शिवदास
सातारा – जावळी मतदार संघातून शिवेंद्रराजे भोसले, दीपक पवार, अमित कदम, संतोष (भाऊ) जाधव, अभय पवार, सौ स्मिता निकम, सौ सुनिशा शहा.
वाई मतदार संघातून मदन (दादा) भोसले, चंद्रकांत काळे, मोनिका धायगुडे, अविनाश फरांदे , प्रशांत जगताप, रामदास शिंदे, दीपक जाधव सचिन घाडगे, प्रदीप क्षीरसागर, शैलेंद्र वीर, दिनकर शिंदे, माण खटाव मतदारसंघातून डॉ. दिलीप येळगावकर, बाळासाहेब मासाळ, अनिल देसाई, सचिन गुदगे, महादेव कापसे, पाटण मतदार संघातून भरत पाटील, कविता कचरे, सुरेखा तुपे, नानासो सावंत, रामचंद्र लाहोटी,दीपक महाडिक, सागर माने, नितीन जाधव. कराड दक्षिण मतदार संघातून जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर, डॉ. अतुल(बाबा) भोसले, फलटण मतदार संघातून सौ. स्वप्नाली शिंदे, रावसाहेब क्षीरसागर, मिलिंद काकडे, शैलेंद्र कांबळे, सुधीर अडागळे, राजेंद्र काकडे, नयना भगत, राज सोनावले, विश्वनाथ शिंदे, वसंत निकाळजे, संदीप(भाऊ) शिंदे यांनी मुलाखती दिल्या. सर्वच मतदार संघातून इच्छुकांनी गर्दी केली होती, एकूण 58 जणांनी मुलाखती दिल्या. यामध्ये सात महिलांचा समावेश होता. इच्छुक महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.