Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीपोलीस नाईक कर्मचार्‍यांची वेतनाची समस्या तातडीने दूर करणार

पोलीस नाईक कर्मचार्‍यांची वेतनाची समस्या तातडीने दूर करणार

शिवेंद्रसिंहराजे भोसले; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन काढणार तोडगा
सातारा : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरिक्षक आदी पदांवर असंय कर्मचारी नियुक्त आहेत. महाराष्ट्र शासनाकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यामध्ये बक्षी आयोगाकडून करण्यात आलेल्या शिफारशीनुसार पगारवाढ करण्यात आली आहे. वेतन आयोग लागण्यापुर्वी पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरिक्षक यांना 750 रुपये विशेष वेतन देण्यात येते. नुतन वेतनश्रेणीमधून केवळ पोलीस नाईक कर्मचारी यांना वगळून इतर सर्व कर्मचार्‍यांना विशेष वेतन सुरु ठेवण्यात आले आहे. सर्व कर्मचार्‍यांप्रमाणे पोलीस नाईक कर्मचार्‍यांनाही वेतन मिळाले पाहिजे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची भेट घेवून तोडगा काढणार असून पोलीस नाईक कर्मचार्‍यांची वेतनाची समस्या दूर करु, अशी ग्वाही श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
पोलीस कर्मचार्‍यांमध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरिक्षक अशी पदनिर्मीती आहे. राज्यात एकूण पोलीस कर्मचार्‍यांपैकी 30 टक्के पोलीस कर्मचारी हे पोलीस नाईक या पदावर काम करत आहेत. बक्षी आयोगाकडून करण्यात आलेल्या शिफारशीनुसार पगारवाढ करण्यात आली आहे. वेतन आयोग लागण्यापुर्वी पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरिक्षक यांना 750 रुपये विशेष वेतन देण्यात येते. नुतन वेतनश्रेणीमधून केवळ पोलीस नाईक कर्मचारी यांना वगळून इतर सर्व कर्मचार्‍यांना हे विशेष वेतन सुरु ठेवण्यात आले आहे. सर्व कर्मचार्‍यांप्रमाणे पोलीस नाईक कर्मचार्‍यांनाही विशेष वेतन मिळाले पाहिजे, यासाठी काही समाजीक कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेवून पोलीस नाईक कर्मचार्‍यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली.
सदरच्या निर्णयामुळे संपुर्ण राज्यातील पोलीस नाईक यांना दरमहा 750 रुपये कमी वेतन मिळत आहे. संपुर्ण पोलीस दलातील 30 टक्के कर्मचार्‍यांवर या निर्णयामुळे अन्याय होत आहे. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी बांधवांप्रमाणेच पोलीस नाईक कर्मचार्‍यांनाही दरमहा दिले जाणारे विशेष वेतन देण्याचा निर्णय घ्यावा आणि पोलीस बांधवांवर सुरु असलेला अन्याय थांबावा, अशी मागणी नातेवाईकांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली. पोलीस हा समाजव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. अहोरात्र जनतेची सुरक्षा आणि सेवा करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर शासनाकडून कोणताही अन्याय होता कामा नये. त्यामुळे पोलीस नाईक कर्मचार्‍यांच्या वेतन समस्येबाबत लवकरच मुयमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांची भेट घेवून सर्व पोलीस बांधवांप्रमाणेच पोलीस नाईक कर्मचार्‍यांनाही वेतन मिळावे. त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा, यासाठी आगही भुमिका घेवू आणि हा प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थितांना दिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular