वर्णे – आबापुरीत कालभैरवनाथाचे उदयनराजेंनी घेतले दर्शन

वार्षिक यात्रेनिमित्त भाविकांना दिल्या शुभेच्छा.
सातारा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्णे – आबापुरी येथील कालभैरवनाथाच्या वार्षिक यात्रेनिमित्त खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवारी) कालभैरवनाथाचे दर्शन घेतले तसेच वार्षिक यात्रेनिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या.
सातार्‍यापासून 22 किलोमीटरवर आणि महामार्गावर बोरगावपासून 8 किलोमीटरवर असलेल्या आणि क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेल्या या देवस्थानाची दरवर्षी फाल्गुन वद्य दशमीस यात्रा असते. आज यात्रेच्या पहिल्याच दिवशी गुलाल खोबर्‍याची उधळण करीत आणि कालभैरवनाथाचे चांगभलं असा गजर करीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवारी) कालभैरवनाथाचे दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त आबापुरीच्या मंदिरातून देवाची पालखी वर्णे गावात आणली जाते व त्यानंतर पुन्हा आबापुरीस नेली जाते. या यात्रा सोहळयात सहभागी होत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी देवदर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समितीच्या सदस्या कांचनताई काळंगे, सरपंच रसिका काळंगे, उपसरपंच अशोक भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पंचायत समितीच्या सदस्या कांचनताई काळंगे यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. यावेळी जिन्यातर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पवार, दादासाहेब काळंगे,
माजी सरपंच धैर्यशील पवार, विनोद पवार, अशोक भोसले, पां. प. पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.