नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्या पुन्हा सातार्‍यात

सातारा ः सातारा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रचारात मोठी बाजी मारली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच जिल्ह्याचा खुंंटलेला विकास पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी नरेंद्र पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या उद्देशाने राज्याच्या मुख्यमंत्री पुन्हा सातार्‍यात सभा घेत आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता गांधी मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी महाराष्ट्राचे महसुलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप प्रवक्ते भरत पाटील, शिवसेनेचे नेते पुरूषोत्तम जाधव, किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेश शिंदे, कराड उत्तर मतदारसंघाचे अध्यक्ष मनोजदादा घोरपडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेना नेते रणजितसिंह भोसले, रामकृष्ण वेताळ भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष राहूल बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.
सातारा येथील गांंधी मैदानावर शनिवारी दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता होणार्‍या या सभेस शिवसेना-भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.