पश्चिम महाराष्ट्रातल्या फुलपाखरांचे मराठी बारसे

आंबोली व कोयना येथील फुलखारांवर विशेष अभ्यास
सातारा : पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात सर्वत्र आढळणार्‍या 285 पेक्षा अधिक फुलपाखरांना चक्क आता मराठी नावे मिळाली आहेत. ढवळ्या पवळ्या कवडा गुब्बी अशोका या गमतीशीर नावांनी ही फुलपाखरे आता ओळखली जाणार असून राज्य जैवविविधता महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
फुलपाखरांच्या शास्त्रीय नोंदी आता चक्क मराठी नावाने होणार असून यामुळे लॅटिन भाषेतील नोंदीची परंपरा मोडीत निघणार आहे .पश्चिम घाटाचा अधिवास दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी व वेगळ्या प्रजातीच्या कीटकांनी प्रचंड समृध्द आहे. महाराष्ट्रात जी वेगवेगळ्या प्रजातीची तीनशे फुलपाखरे आढळतात ती लॅटिन नावानेच ओळखली जातात. कमांडर, सार्जंट, लास्कर, काउंट, ड्यूक, सेलर, या विविध पदावर काम करणार्‍या ब्रिटिश अधिकारी कम संशोधकांनी ही नावे दिली . भारतीय फुलपाखरांना चक्क लॅटिन नावे हा फरक दूर करण्याचा निर्णय राज्याच्या जैवविविधता महामंडळाने सहा महिन्यापूर्वी घेतला. आता या निर्णयाची अंमलबजावणी तत्वतः 25 एप्रिल सुरू होत आहे.
या उपक्रमासाठी नेमलेल्या समितीत फुलपाखरूअभ्यासक डॉ. विलास बर्डेकर, हेमंत ओगले, जयंत वडतकर, दिवाकर ठोंबरे, राजू कसंबे यांचा समावेश आहे. या समितीने गडचिरोली, चंद्रपूर, सापुतारा, आंबोली , कोयना, बाबू कडा (वासोटा) या भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन फुलपाखरांचे प्रजोत्पादन व त्यांचा दिनक्रम यांचा विशेषत्वाने अभ्यास केला. वेबसाईटवर प्रसिद्ध असणार्‍या फुलपाखरांविषयी सांगताना डॉ. बर्डेकर म्हणाले.
राज्यात फुलपाखरांच्या पंधराशे जाती आढळतात. एकटया महाराष्ट्रात या प्रजाती 285 आहेत. ब्ल्यू मॉरमॅान या फुलपाखराला दोन वर्षापूर्वी. अधिकृत राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता.
चौकट- फुलपाखरांची नावे वेबसाईटवर -फुलपाखरांच्या नोंदी कृत फुलपाखरांची नावे महाराष्ट्र जैवविविधता मघमंडळाच्या वेबसाईटवर नोंद करण्यात आली आहे. फुल पाखरांच्या नावांची नोंद करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
चौकट- फुलपाखरांना मिळाली मराठी नावे ब्लू मॉरमॉन- निलवंत , कॉमन मॉर्मॉन- बहुरूपी, मलबार रेवेन -द्रविड, पॅरिस पिकॉक – परीमयूर, लाईम बटरफलाय- लिंबाळी .टेल्ड जे- अशोका, कॉमन जे – तुषार.