निवडणूकीच्या धामधुमीत आनेवाडी, खेड-शिवापूर टोल नाक्यावर दरवाढीचा झटका

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अनंत अडचणी आहेत. सेवा रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे स्थानिक वाहन चालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागतो. तर लांब पल्याच्या वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकवून पुढे जावे लागते. असे असतानाही लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोल वसुलीचा दरवाढीचा झटका देण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष न घातल्यास कायद व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमवार दि. 1 एप्रिल पासून हा नवीन टोलदर वाहन चालकांच्या खिशावर पाच रूपयांपासून ते पंधरा रूपयांपर्यंत डल्ला मारणार आहेत. त्यामुळे टोलनाका वसुलीच्या ठेकेदारांना आता आपल्या राजकीय आश्रय असणार्‍या नेत्याच्या प्रचाराला मदत करणे, म्हणजे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार घडणार आहे. यामध्ये मासिक प्रवासासाठी असणारे शुल्क यामध्ये ङ्गारसा बदल झाला नसला तरी, 140 कि.मी. सातारा व पुणे हद्दीत असणार्‍या आनेवाडी व खेड-शिवापूर सध्या काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. त्यावर निवडणूकीच्या तोंडावर पडदा पडला आहे. या टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिकांना प्राध्यान द्यावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. परंतु ज्यांची गुंठभर जमीन सुद्धा या महामार्गावर गेलेली नाही, अशा लोकांना टोल वसुलीचा ठेका काही राजकीय नेत्यांच्या बगलबच्चांना देवून स्थानिकांवर अन्याय केला आहे.र्दुदैवाने विरोधकांनी सुद्धा नांगी टाकल्यामुळे ईकडे आड, तिकडे विहिरफ अशी स्थानिकांची अवस्था झाली आहे.
आनेवाडी व खेड-शिवापूर याठिकाणी स्थानिक भुमीपुत्र शेंगा, शुद्धपाणी, काकडी, स्टॉबेरी, बॉबी अशी खाद्य पदार्थ विक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. तर स्थानिक राजकीय नेत्याच्या आश्रयाखाली असणारे व सातत्याने दमदाटी, खंडणी, खुणाची धमकी, हप्ते वसुली अशा अनेक गुन्ह्यांमध्ये जेलवारी करणारे सध्या या टोलनाक्याचे व्यवस्थापन पाहत आहेत. सध्या निवडणूकीचा जोर असून स्थानिक मतदारांनी मतदान यंत्रणाद्वारे अशा नेत्यांना धडा शिकवण्यासाठी विरोधात मतदान घेतल्याची खळबळ माजली आहे. दरम्यान स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये वाढत्या तक्रारी प्रवाशांच्या येऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने पोलिस खाते विरूद्ध नाराजी पसरली आहे. अशी माहिती महामार्गावरील दोन एक्कर जमीन गेलेल्या आनेवाडी, मर्ढे, रायगाव येथील शेतकर्‍यांनी सागितले.