ठोसेघर फेसाळला

पश्चिमेकडे संततधार; धबधबे खळाळू लागले
परळी : गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असल्याने या परिसरातील ओढे नाले खळाळू लागले आहेत पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा ठोसेघर धबधबाही फेसाळला आहे. याबरोबरच वजराई भांबवली धबधबा केळवली सांडवली धबधबा ही ओसंडून वाहू लागला आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले होते त्यामुळे शेतीची कामे थोडी उशिरा सुरू झाली गेल्या ते पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडल्याने पश्चिमेकडे हिरवाई पसरली आहे. ओढे नाले वाहू लागले आहेत कासच्या पाणीपातळीत पंधरा फुटांनी वाढ झाली असून ठोसेघर पठारावरील जगमीन चिखली पांगारे पळसावडे या तलावातील पाणी पातळी वाढू लागली आहे.
पावसाळी पर्यटन बहरणार
या वर्षी ठोसेघर धबधबा परिसरात पावसाळी पर्यटकांसाठी धबधब्या बरोबरच गुहा बनवण्यात आले आहे परिसरातील सुशोभिकरण करण्यात आले आहे तर भांबवली वजराई देवीची पर्यटनासाठी येणारी पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता बनविण्यात आला असून सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.
ठोसेघर येथे पार्किंग व्यवस्था मोफत
ठोसेघर पाहण्यासाठी पावसाळ्यात हजारो पर्यटक भेट देत असतात त्यातच पार्किंग धबधबा पाहण्यासाठी वेगवेगळ्या फि आकारली जात होती मात्र यावर्षी पार्किंग फी न घेता प्रतिव्यक्ती तीस रुपये घेण्यात येणार आहे तर पार्किंगच्या पैसे घेण्यात येणार नाहीत असे संयुक्त व्यवस्थापन समिती ठोसेघर यांनी सांगितले.