काळोशी येथे दोन इसमांवर रानडुकरांचा हल्ला

बचावासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात रानडुकराचा मृत्यू, जखमींवर शिकारीचा गुन्हा दाखल
परळी : काळोशी, (ता. सातारा) येथे मंगळवारी सकाळी शेतात पाहणीसाठी गेलेल्या दोन इसमांवर रानडुकरांनी प्राणघातक हल्ला केला हा हल्ला परतण्यासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात रानडुकर मरण पावल्याने तर सदर इसम गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या इसमांवर वनरक्षक यांनी शिकारीचा गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की काळोशी (तालुका सातारा) येथे मंगळवारी सकाळी 7.30 दरम्यान गावातील वाघजाई देवीच्या पाठीमागे भात शेतात सूर्यकांत लक्ष्मण डफळ (वय 50), गणेश मारुती डफळ (वय 55) हे आपल्या भातशेतीमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते यावेळी अचानक झुडपातून रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला हा हल्ला करतात क्षणी आरडाओरडा करीत ग्रामस्थांना बोलवत आपला बचाव करीत प्रती हल्ला केला या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहे.
याबाबत वनरक्षक पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले रानडुक्कर हे काळोशी गावात अण्णांच्या शोधात आले असेल यावेळी गावातील लोकांनी हुसकवण्याचा प्रयत्न केला तसेच सूर्यकांत डफळ व गणेश डफळ यांनी या रानडुकराला हिसकवण्यासाठी भाला व दगडाच्या सहाय्याने प्रयत्न केला. या प्रतिहल्ल्यात रानडुक्कर मरण पावले सदर घटने ठिकाणी प्रशांत कुमार पडवळ वनरक्षक परळी, राजकुमार मोसलगी वनरक्षक ठोसेकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला व परळी येथील कार्यालयाच्या आवारात शवविच्छेदन करून विल्हेवाट करण्यात आली. पुढील तपास वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.