मेणवली येथे धोम डाव्या कालव्यावरील पुल कोसळला

वाई : मेणवली, ता. वाई येथील धोम डाव्या कालव्यावरील वाघजाईनगर वस्तीला जोडणारा कालव्यावरील पुलावरून रविवार दि. 10 रोजी रात्री दहाच्या सुमारास जेसीबी गेल्याने आधीच मोडकळीस आलेला पुल कोसळला. रात्रीची वेळ असल्याने व जेसीबी पुल ओलांडून पुढे गेल्यानतंर पुल कोसल्याने कोणतीही जिवीत अथवा अर्थिक हानी झाली नाही.
दरम्यान पंधरादिवसा पुर्वी पुलाचा काही भाग कोसळल्याने मेणवली ग्रामस्थ, परिसरातील नागरीकांनी धोम पाटबंधारे खात्याला तशा आशयाचे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आ. मकरंद पाटील यांनी सदर पुलाची पहाणी करून संमंधीत विभागाला तशा सूचना दिल्या होत्या पंरतू पाटंबधारे खात्याने कोणतीही दखल न घेत्याने सदरची घटना घडली आहे. त्यामुळे वाघजाई नगरमधील सुमारे वीस कुंटूंबिंयांचा रहदारीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तसेच मेणवली गावातील शेतकर्‍यांना या परिसरात जाण्या-येण्यासाठी एकमेव पुल असल्याने व सध्या खरीप हंगामाची मशागतीची कामे वेगाने सूरू झाली असल्याने व या परिसरात एकमेव पुल असल्याने शेतकर्‍यांची मोठी गैरसोय झाल्याचे शेतकर्‍यांनी बोलून दाखवले. तरी पाटबंधारे विभागाने त्वरीत येथे नवीन पुल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.