सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वाई यांचेकडून वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रारंभ

बारा हजार आठशे वृक्षांचे वृक्षारोपण करून केला शुभारंभ
वाई : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वाई यांचेकडून वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रारंभ.भुईंज मध्ये आठ हेक्टर क्षेत्रावर बारा हजार आठशे (12800) रोपे लावून वृक्षारोपण करून सुरुवात.महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण वाई कार्यालयाकडून 199633 रोपेलगवड करण्यात येणार आहे.
सदर वृक्षलागवड जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधी मध्ये करण्यात येणार असून समाजातील विविध घटकांना सामावून घेण्यात येत आहे. सदर वृक्ष लागवड शुभारंभ कार्यक्रमावेळी भुईंज गावचे सरपंच अर्जुन भोसले, ग्रामपंचायत सदस्य सौ सविता ठोंम्बरे उपस्थित होते. तसेच नेहरू युवा मंडळ, प्राथमिक शाळा भिरडाचीवाडी(भुईंज) मुख्याध्यापक कुंभार मॅडम, व सर्व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी संतोष चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वाई यांनी वृक्ष लागवड कामाची माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
तसेच वनमहोत्सव अंतर्गत सवलतीच्या दरात रोपेपूरवठा होणार असून त्याचाही नागरिकांनी फायदा घेण्याचे आवाहन केले. वनपाल श्री सुनील चव्हाण व वनपाल रमेश वालकोळी यांनी कन्या वन समृद्धी योजनेची माहिती देऊन प्रत्येक शेतकरी कुटुंबात जन्माला येणार्‍या मुलीच्या नावे 10फळझाडे सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी वनरक्षक श्री विजय फरांदे, वनमजुर पुंडलिक अडसूळ उपस्थित होते व सर्व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.