नवीन वर्षाचे स्वागत रक्तदान करून…

म्हसवड: नवीन वर्षा निमित्त रक्तदान करून म्हसवड येथील निर्भीड फौंडेशन ने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन डॉ. नितीन वाघमोडे साहेब अतिरिक्त आयुक्त आयकर विभाग मुंबई यांच्या हस्ते झाले. या शिबिरात स्वतः डॉ वाघमोडे साहेबांनी रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवला. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला.
140 रक्तदात्त्यानी रक्तदान केले. या शिबिरास आय एम एस आर ब्लड बँक मायणी चे संजय रायबोले व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरास डॉ. जयवंत गलंडे, डॉ. विकास बाबर, शहाजी बनगर, विक्रम शिंगाडे, डॉ. पंकज गलंडे,अध्यक्ष डॉ. चेतन गलंडे, राज्य समन्वयक जनार्धन गलंडे व निर्भीडचे पदाधिकारी उपस्थित होते.
निर्भीड फौंडेशन नेहमीच रक्तदान व अवयवदान जनजागृती मध्ये अग्रेसर असते.या वर्षभरात त्यांनी म्हसवड येथील 3 शिबिरांमधून सुमारे 300 रक्तपिशव्या व गणपती उत्सवा दरम्यान 350 रक्तपिशव्या संकलन विविध शिबिरातून केले आहे. निर्भीड फौंडेशन ने केरळ पुरग्रस्तांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांचा सुमारे 20 हजार पुरग्रस्तांना फायदा झाला. विविध आरोग्य शिबीरे, दंत चिकित्सा शिबिरे, करियर अकॅडमी पुस्तके व शैक्षणीक साहित्य वाटप असे विविध आरोग्य व शैक्षणिक उपक्रम निर्भीड फौंडेशनच्या च्या माध्यमातून राबवले जातात.