Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीकरवडीला बैलगाडी शर्यती रोखल्या ; 23 जणांवर गुन्हा

करवडीला बैलगाडी शर्यती रोखल्या ; 23 जणांवर गुन्हा

कराड : सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाचे उल्लघंन करून करवडी (ता. कराड) येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती पोलिसांनी रोखल्या. याप्रकरणी बैलगाडी व बैल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनचालकांसह बैलगाडी मालक असा 23 जणांवर कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, करवडी येथे डोंगराच्या बाजुला बैलगाड्यांच्या शर्यती सुरु असल्याचा फोन पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी आला. यावेळी त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना जाग्यावर जाऊन खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी करवडी येथे जाऊन सुरु असलेल्या बैलगाडी शर्यती रोखल्या.
याप्रकरणी संतोष शहाजी माळी (धोत्रेवाडी, ता. वाळवा), दादासो विष्णू शेवाळे (म्हासोली), किरण मोहन जंगम (म्हासोली), शहाजी तुकाराम वाघमारे (साळशिरंबे), किरण प्रकाश भिसे (मुजावर कॉलनी, कराड), अमोल जगन्नाथ पवार (ढेबेवाडी), प्रविण अशोक खोत (ओझर्डे, ता. वाळवा), समाधान मारुती जगताप (माळवाडी), विनायक निवासराव पाटील (नादंगाव), सचिन जोतीराम पवार (वहागाव), शहाजी धनाजी गायकवाड (तळबीड), अतुल बबन गडकरी (काले) हे वाहन चालक, मालक तर सचिन बापू सुर्यवंशी (धोत्रेवाडी), बाबासो ईश्वर पवार (म्हासोली), प्रबोधन अधिकराव  वाघमोडे (भेरेवाडी), किरण प्रकाश भिसे (कराड), आनंदराव तात्यासो भिसे (तारुख), विजय मारूती माने (ओझर्डे), सुमित अनिल काशीद (माळवाडी), गणेश पंढरीनाथ पवार (वहागाव), बापूराव तुकाराम पवार (वहागाव), रणजीत मदन पाटील (काले), गणेश कृष्णत पोळ (करवडी) यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बैलगाडी शर्यतींसाठी सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश असतानाही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन करून बेकायदेशीररित्या बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या करवाईत पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राठोड, भापकर, पोलिस हवालदार तारळकर, माने, यांनी  सहभाग घेतला. अमित पवार यांनी फिर्याद दिली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular